
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनीसार, मयत महादेव कुसाप्पा पुजारी (वय ७०) यांचा मुलगा काशिनाथ महादेव पुजारी (४०) याच्याशी शेतवाटप व जनावरांच्या वादावरून वारंवार खटके उडत होते. याच रागातून काशिनाथने वडिलांच्या डोक्यात दगड घालून गंभीर दुखापत केली. उपचारापूर्वीच महादेव पुजारी यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७:३० वाजण्याच्या सुमारास डोणज येथील अशोक रामचंद्र मलगोंडे यांच्या पडीक जमिनीत ही घटना घडली.
या घटनेची तक्रार विकास विश्वल कोरे (वय २२, रा. डोणज) यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १०३ (१) अन्वये गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बनकर करीत आहेत. या घटनेमुळे डोणज परिसरात खळबळ उडाली आहे.
गावात चर्चा
आरोपी काशिनाथ पुजारी हा घटनेच्या दिवशी अमावास्येला आरकेरी येथील देवस्थानला जाऊन आला होता. परत घरी आल्यानंतर दारू पियुन नशेत असतानाच काशिनाथ महादेव पुजारी हे कृत्य केल्याची चारचा आहे. मुलगा व्यसनाधीन असल्याने मालमत्ता खर्च होऊ नये, या हेतुने वडिलांनी जमीन वाटपास नकार दिला होता, अशी चर्चा गावात रंगली होती.
इंजिनिअरिंग कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये 20 वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; वडिलांचा फोन आला आणि…
सोलापूर शहरातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमधील बॉईज हॉस्टेलमध्ये एका २० वर्षीय विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव विद्याधर प्रकाश शिंदे (वय 20, रा. कळंब, जि. धाराशिव) असे आहे. विद्याधरने दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. विद्याधर हा कॉलेजमध्ये ई अँड टीसी (E&TC) शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता आणि तो कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होता. या घटनेमुळे कॉलेजपरिसरात तसेच कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.
Punjab Crime: व्यापाऱ्याचा खून! कारमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह; घरकाम करणारीच ठरली कटामागे
Ans: सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील डोणज गावात.
Ans: शेतवाटप, जनावरे पिकात जाणे आणि कौटुंबिक वाद.
Ans: बीएनएस कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.