Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: क्रिकेट समर कॅम्पमध्ये दुर्दैवी मृत्यू! 14 वर्षीय वीरेन रोलरखाली चिरडला; मैदान व्यवस्थापनावर संताप

बार्शीतील शिवशक्ती मैदानावर क्रिकेट समर कॅम्पदरम्यान 14 वर्षीय वीरेन चौधरीचा जड दगडी रोलरखाली चिरडून मृत्यू झाला. रोलर काही अल्पवयीन मुले चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मैदान व्यवस्थापन आणि आयोजकांच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 31, 2026 | 12:04 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बार्शीतील शिवशक्ती मैदानावर क्रिकेट समर कॅम्पमध्ये 14 वर्षीय वीरेन चौधरीचा अपघाती मृत्यू.
  • क्रिकेट पिच रोलिंगसाठी वापरण्यात येणारा जड दगडी रोलर काही अल्पवयीन मुले चालवत होती.
  • घटनेनंतर आयोजकांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह; चौकशी व कारवाईची मागणी.
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी समर कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या 14 वर्षीय मुलाचा जड दगडी रोलरखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी (30 मे) सकाळी बार्शीतील शिवशक्ती मैदानावर ही घटना घडली. वीरेन योगीराज चौधरी (वय 14, रा. सुभाष नगर, बार्शी) असे मृत मुलाचे नाव आहे.

काय घडलं नेमकं?

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवशक्ती मैदानावर गेल्या दीड महिन्यांपासून क्रिकेट समर कॅम्प सुरू होता. शनिवारी कॅम्पचा शेवटचा दिवस असल्याने मैदानावर खेळाडूंची मोठी गर्दी होती. सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास क्रिकेट खेळपट्टी सपाट करण्यासाठी वापरला जाणारा जड दगडी रोलर काही अल्पवयीन मुले चालवत होती.

याचवेळी मैदानावर खेळण्यासाठी आलेल्या वीरेन चौधरीचा पाय अचानक रोलरखाली अडकला. तोल गेल्याने तो खाली पडला आणि अवजड रोलर त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या भीषण अपघातात त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

Raigad Crime: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; उभ्या कंटेनरवर कार आदळली, दोन महिलांचा मृत्यू

उपचारापूर्वीच मृत्यू

घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि कुटुंबीयांनी वीरेनला तातडीने उपचारासाठी डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

नागरिकांमध्ये संताप

या घटनेनंतर नागरिकांनी मैदान व्यवस्थापन आणि समर कॅम्प आयोजकांच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. एवढा जड आणि धोकादायक रोलर अल्पवयीन मुलांकडे कसा सोपवण्यात आला, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. समर कॅम्पच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण बार्शी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत्यूनंतर ‘उत्पादन शुल्क’ला जाग, पुणे-पिंपरीतून 4 हजार 480 लिटर गावठी दारू जप्त; 52 जणांना अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: वीरेन चौधरीचा मृत्यू कसा झाला?

    Ans: क्रिकेट खेळपट्टीवरील जड दगडी रोलरखाली पाय अडकल्याने तो पडला आणि रोलर अंगावरून गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बार्शी शहरातील शिवशक्ती मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट समर कॅम्पमध्ये ही घटना घडली.

  • Que: नागरिकांनी कोणती मागणी केली आहे?

    Ans: या दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Solapur crime unfortunate death in cricket summer camp viren rollerkhali chirdala 14 grounds management problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Thane Crime News: मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून; शीर आणि दोन्ही हात धडापासून केले वेगळे, नंतर…
1

Thane Crime News: मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून; शीर आणि दोन्ही हात धडापासून केले वेगळे, नंतर…

Dhule Crime: ‘माझ्यावर अन्याय झाला’…भावनिक व्हिडीओ बनवत २८ वर्षीय तरुणाची तापी नदीत उडी; दोन दिवसांनी सापडला मृतदेह
2

Dhule Crime: ‘माझ्यावर अन्याय झाला’…भावनिक व्हिडीओ बनवत २८ वर्षीय तरुणाची तापी नदीत उडी; दोन दिवसांनी सापडला मृतदेह

Pune Crime: पुण्यात अजब चोरी! कोंबड्यांनाही नाही सुरक्षा; टेम्पोतून 800 जिवंत कोंबड्या लंपास
3

Pune Crime: पुण्यात अजब चोरी! कोंबड्यांनाही नाही सुरक्षा; टेम्पोतून 800 जिवंत कोंबड्या लंपास

Yavatmal Crime: मुलीच्या सुखासाठी लग्न लावून दिलं, पण छळ सहन न झाल्याने सासऱ्यानेच जावयाची कुऱ्हाडीने केली हत्या
4

Yavatmal Crime: मुलीच्या सुखासाठी लग्न लावून दिलं, पण छळ सहन न झाल्याने सासऱ्यानेच जावयाची कुऱ्हाडीने केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.