Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: धक्कादायक! हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईपने मारहाण; व्हिडिओ व्हायरल

टेंभुर्णीतील हॉटेल 77 77 मध्ये मालक लखन माने यांनी मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईपने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. घटना स्टाफसमोर घडली असूनही पोलिसांत गुन्हा दाखल नाही.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 15, 2025 | 01:34 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • हॉटेल मालकाने मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईपने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल
  • पोलिसांकडे गुन्हा दाखल नसल्याने संताप व्यक्त; मालक अजूनही मोकाट
  • मालक व मॅनेजर दोघांचेही स्पष्टीकरण “व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल”
सोलापूर: सोलापूरमधून एक धक्कादायक आणि घृणास्पद घटना समोर आली आहे. पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी जवळील एका हॉटेल मालकाने मॅनेजरच्या चुकीमुळे नग्न करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. हॉटेल मधील मॅनेजरने चुकीमुळे त्याला अक्षरशः नग्न करून लोखंडी पाईपने मारहाण केल्याचा हा व्हिडीओ वायरल झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणतीही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती समोर आली आहे.

सायबर चोरट्यांनी आता लढवली ‘ही’ नवी शक्कल; APK फाईल पाठवतात अन् एक क्लिक करताच…

नेमकं काय प्रकरण?

हॉटेल मधील मॅनेजरने केलेल्या चुकीमुळे त्याला अक्षरशः नग्न करुन लोखंडी पाईपने मारहाण केल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ही घटना टेंभुर्णी येथील हॉटेल 77 77 या हॉटेल मध्ये घडली आहे. मुजोर मालक लखन माने याने ही मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कदायक बाब म्हणजे ही मारहाण हॉटेलच्या सर्व स्टाफ समोर केली आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेबाबत मॅनेजर आणि हॉटेल मालक यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मॅनेजरने काय दिले स्पष्टीकरण?

या व्हिडिओ बाबत स्पष्टीकरण देताना हॉटेलचा मालक लखन माने याने त्याच्या मॅनेजरसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये त्यानी म्हटले, दुपारपासून माझा एक व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो वेगळ्या पद्धतीने मांडला गेला आहे आणि कुठेतरी माझं आणि हॉटेलचं त्याचबरोबर मॅनेजरचाही नाव बदनाम करण्यात येत आहे. त्या मागची सत्यता काय आहे, तो व्हिडिओ काय आहे, तो व्हिडिओ कोणी काढला, का काढला, कसा काढला, ते बघूयात. तुम्हाला मॅनेजर सांगतील त्या दिवशी काय घडलं होतं, त्यावर मॅनेजरने सांगितलं की, मी गेल्या अनेक दिवसापासून या हॉटेलमध्ये कामाला आहे. चार-पाच महिन्यापूर्वी मी ड्रिंक केली होती. मला काही सुचत नव्हतं. मला घरचा टेन्शन होतं. त्यामुळे मी ड्रिंक केलं आणि त्यावेळी मी हॉटेलवर आल्यावर मला दादांनी पनिशमेंट दिली होती. पण मी काम इथच करणार आणि शिवाय मला हे माझे फॅमिली मेंबर आहेत. त्यांनी मला लागेल तेव्हा मदत केलेली आहे. हवे तेव्हा पैसे दिलेले आहेत. हा व्हिडिओ ज्या कोणी व्हायरल केला आहे त्यांनी असं करू नये. आज आमच्या हॉटेलचं नाव आणि दादांचं नाव बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, या गोष्टी करू नका असं मी बोलू इच्छितो असंही व्हिडिओमध्ये मार खाणाऱ्या मॅनेजरने म्हटलं आहे.

मालकाने काय दिले स्पष्टीकरण

तर पुढे हॉटेल मालकाने म्हटले हॉटेल 77 77 हे एका कुटुंबाप्रमाणे आहे. इथे काही घटना घडल्या असतील त्या मागची सत्यता काय आहे ती समजून घेतल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ व्हायरल करू नका. महाराष्ट्रात मोठं होणं म्हणजे चुकीचं आहे का? अशी काम करू नका, अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून असं काही पसरवू नका जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोट आहे, मी त्या गोष्टी केल्या नाहीत. मी जे काही केलं ते मॅनेजरने तुम्हाला समोर सांगितलं आहे. जर काही विषय असते तर इतकं मोठं हॉटेल मॅनेजरच्या हातात दिलं नसतं, आमचं नातं भावासारखा आहे, त्यात गालबोट लागणार नाही. जो व्हिडिओ व्हायरल करत आहेत त्यांना माझं नाव बदनाम करायचा आहे, तो हेतू त्यांचा कधीही पूर्ण होणार नाही, सत्य समोर येईल. फक्त जे खरं आहे ते हे आहे, असंही लखन माने यानी म्हटलं आहे.

सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी जवळील एका हॉटेल मालकाने मॅनेजरच्या चुकीमुळे केली नग्न करून मारहाण .. व्हिडिओ झाला व्हायरल, त्यानंतर हॉटेल मालक आणि चालक या दोघांनीही त्या घटनेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.#solapurnews #Videoviral pic.twitter.com/BRIC9eD0iT — Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) November 15, 2025

 

पुण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; नेमकं कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: टेंभुर्णी

  • Que: हॉटेलचे नाव काय?

    Ans: 77 77

  • Que: मॅनेजरवर हल्ला करण्यासाठी काय वापरले?

    Ans: पाईप

Web Title: Solapur crimehotel owner strips manager naked and beats him with an iron pipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 01:34 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद
1

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद

Navi Mumbai: नववर्ष स्वागतासाठी नवी मुंबई पोलिसांचा कडक बंदोबस्त, 2500 पोलीस तैनात
2

Navi Mumbai: नववर्ष स्वागतासाठी नवी मुंबई पोलिसांचा कडक बंदोबस्त, 2500 पोलीस तैनात

Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…
3

Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

मैत्रीच्या आड लपलेला राक्षस! मैत्रिणीनेच पोट चिरून बाळ काढण्याचा केला प्रयत्न; अमेरिकेत गाजलेलं प्रकरण
4

मैत्रीच्या आड लपलेला राक्षस! मैत्रिणीनेच पोट चिरून बाळ काढण्याचा केला प्रयत्न; अमेरिकेत गाजलेलं प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.