
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
गोरख आणि सुरेश हे दोघेही अत्यंत साध्या कुटुंबातील होते. गावातील कोणत्याही कामासाठी, अथवा शेतात जाण्यासाठी ते एकत्रच दिसायचे. गावकऱ्यांच्या मते, त्यांच्या मैत्रीची घट्टता पाहून अनेकांना कौतुक वाटत असे. मात्र काहीच दिवसांपूर्वी या घट्ट नात्याला काळ लागला. गोरख भोई यांनी आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती जसजशी गावात पसरली, तसतशी सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाऊ लागली. बातमी कळताच सुरेशने तात्काळ गोरखच्या घरी धाव घेतली.
जिवलग मित्राने टोकाचा निर्णय घेतल्याने सुरेश खोलवर हादरला. गोरखच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना सुरेशच्या मनात भावनांचा उद्रेक झाला. मित्राविना आयुष्याची कल्पनाच त्याला असह्य झाली. अंत्यसंस्काराच्या वेळी तो सतत व्यथित अवस्थेत दिसत होता. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गोरखचा अंत्यविधी सुरू असतानाच सुरेशही घरातून निघून गेला.
काही वेळाने गावकऱ्यांना समजले की सुरेशनेही शेतात जाऊन झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही बातमी कळताच गावकरी सुन्न झाले. एकाच दिवशी दोन तरुण मित्रांच्या अंत्ययात्रा निघाल्याचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. दोन्ही कुटुंबांवर दुखाचा डोंगर कोसळला. सुरेशचे आईवडील शेतमजूर म्हणून काम करतात, त्यांच्या घरची परिस्थितीही अत्यंत हलाखीची असल्याचे समजते.
या दुर्दैवी प्रकरणाची नोंद दक्षिण सोलापुरातील मंद्रूप पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दोन जिवलग मित्रांच्या अशा प्रकारे एका मागोमाग झालेल्या आत्महत्येने वांगी गावात शोककळा पसरली असून गावकरी अजूनही या घटनेतून सावरू शकले नाहीत.
‘मरायच्या आधी सर्वांच्या मनातून…’; इन्स्टा स्टोरी ठेवत 18 वर्षीय तरुणाने संपवलं जिवन
Ans: वांगी
Ans: मित्र
Ans: मंद्रूप