सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील श्रीपतपिंपरी येथे सहा जणांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ४ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 9:30 वाजता घडली. मोबाईलवर मेसेज पाठवल्याची वादातून हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. जखमी तरुण दोन दिवस बेशुद्धावस्थेत उपचार घेत होता.
Thane Crime: डोंबिवलीत मोठा शस्त्रसाठा उघडकीस! गुन्हे शाखेची छापेमारी; निवडणुकी आधी खळबळ
नेमकं प्रकरण काय?
फिर्यादी उस्मान रुस्तुम पठाण (वय 56, रा. कुसळंब) यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा मुलगा राजू उस्मान पठाण याने एका मुलीला काही मेसेज पाठवले होते. या गोष्टीवरून सुरु झालेला वाद मिटवण्यासाठी आणि माफी मागण्यासाठी त्यांनी ४ नोव्हेंबर रोजी रात्री मुलगा राजू आणि पुतण्या अस्लम पठाण यांना घेऊन संबंधित व्यक्तींकडे भेट दिली. त्यांनी शांततेत हा वाद मिटेल, असे त्यांना वाटले.
दोन दिवस बेशुद्ध
मात्र जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा तिथे आरोपींनी ‘तुला खूप माज आला आहे’ असे म्हणत राजूवर शिवीगाळ आणि धमक्यांचा भडिमार सुरू केला.काही बोलण्याआधीच तल्वारीसह अचानक हल्ला करण्यात आला. हल्ला इतका जोरदार होता की राजू जागीच कोसळून बेशुद्ध झाला. राजुला वाचवण्यासाठी वडील उस्मान पठाण यांनी मध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्यांनाही मारहाण करून जखमी केले. गंभीर जखमी अवस्थेत राजुला तातडीने बार्शीतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे तो तब्बल दोन दिवस बेशुद्ध राहिला.
तपास सुरु
पीडित तरुणावर दोन दिवस बेशुद्ध असतांना उपचार सुरु होते. पीडित शुद्धीवर आल्यानंतर घडलेली संपूर्ण घटना त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर उस्मान पठाण यांनी सहा जणांविरुद्ध बार्शी तालुका पोलिस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली आहे. आरोपींनी पूर्वनियोजितरीत्या समेटाच्या बहाण्याने बोलावून प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस आरोपींची नाव आणि पळून गेले संशयित यांचा शोध घेत आहे. या हल्ल्यामागचा नेमके कारण काय आहे? याचा शुद्ध घेत आहे. या घटनेमुळे श्रीपतपिंपरी परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Ans: तलवारीने
Ans: मुलीला मेसेज पाठवल्यावरून वाद
Ans: दोन दिवस






