Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! घरखर्चाचा वाद बेतला जीवावर; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर

रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना उपचारासाठी घराजवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी चांगल्या दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 22, 2026 | 09:38 AM
घरखर्चाचा वाद बेतला जीवावर; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर

घरखर्चाचा वाद बेतला जीवावर; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर

Follow Us
Follow Us:

नागपूर : घरखर्चात हातभार लावण्यावरून बाप-लेकात झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. संतापलेल्या मुलाने स्क्रू ड्रायव्हर उचलून वडिलांच्या पोटात भोसकला. ही खळबळजनक घटना लकडगंज पोलिस ठाण्यांतर्गत गंगाबाई घाट, गरोबा मैदान परिसरात घडली. गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान तिसऱ्या दिवशी मृत्यू झाला.

बबलू सहारे (वय ५६) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी त्यांचा मुलगा तुषार सहारे (वय २३) याला अटक केली आहे. न्यायालयाने तुषारला २३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बबलू सहारे हे आरमशिनवर काम करत होते. ते पत्नी ममता (वय ४५) आणि मुलगा तुषार यांच्यासोबत राहत होते. तुषार विवाहित असून, तो घरातून साईन बोर्ड तयार करण्याचे काम करत होता. मुलगा मोठा झाल्याने त्यानेही घरखर्चात हातभार लावावा, अशी बबलू यांची अपेक्षा होती.

Kalyan Crime : दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

विशेषतः वीज बिल भरण्यासाठी पैसे देण्यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. १६ सप्टेंबरच्या रात्री १० वाजता याच मुद्यावरून बाप-लेकामध्ये पुन्हा वाद झाला. दारूच्या नशेत असलेल्या बबलू यांनी तुषारचा गळा दाबला. झटापटी दरम्यान तुषारने जवळील पेचकस उचलून बबलू यांच्या पोटात भोसकला. या हल्ल्यात बबलू गंभीर जखमी झाले.

तातडीने रुग्णालयात केले दाखल

रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना उपचारासाठी घराजवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी चांगल्या दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारानंतर घरी आणले मात्र नंतर…

उपचारानंतर बबलू यांना कुटुंबीयांनी घरी आणले. मात्र, १९ सप्टेंबरला अचानक बबलू यांची प्रकृती खालावली. त्यांना तत्काळ उपचारार्थ शताब्दी चौकातील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सायंकाळी ६ वाजता त्यांचा मृत्यू झाला. ममता सहारे यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी तुषारविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी अपडेट; एक-दोन नव्हेतर तब्बल 80 साक्षीदारांचे नोंदवले जबाब, 5053 पानांचे आरोपपत्र

Web Title: Son kills father following a dispute over household expenses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
1

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
2

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ
3

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
4

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.