crime (फोटो सौजन्य: social media)
धाराशिव मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात शहरातील कालिका कला केंद्रावर मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. जुन्या वादातून यात २ जणांवर तलवार, कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. रात्री उशिरापर्यंत हा राडा चालला असून परिसरात काही काळ तणावाचा वातावरण पाहायला मिळाले आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, संदीप गुट्टे आणि रोहित जाधव या दोघांवर हा हल्ला करत मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
MBBS चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन, पोलिसांना माहिती मिळताच…
25 ते 30 जणांच्या जमावाचा दोघांवर प्राणघातक हल्ला
यातील जखमींवर धाराशिव मधील जिल्हा शासकीय रुग्णालय व वैधकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे. तर जुन्या वादातून संदीप गुट्टे आणि रोहित जाधव यांच्यावर २५ ते ३० जणांच्या जमावाने हल्ला केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कलम 326 प्रमाणे येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
चक्क थार गाडीच्या मदतीने एटीएम मशीन ओढून फोडण्याचा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगरच्या शहानूरवाडी दर्गा परिसरातून एक चोरीची धक्कदायक घटना समोर येत आहे. यात एसबीआय बँकेच्या शाखेतील एटीएम मशीन चोरट्यांनी चक्क थार गाडीच्या मदतीने ओढून फोडण्याचा प्रयत्न केला आहे. एटीएम मशीन आणि केबिनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान करण्यात आले आहे. या प्रकरणी चार अज्ञात आरोपींविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे. या चोरीची शहरात सर्वत्र चर्चा होत आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, विशाल हरिदास इंदूरकर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ते एसबीआयच्या शहानूरवाडी शाखेत मॅनेजर आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ४ ऑगस्टला पहाटे ३ ते ४ वाजताच्या सुमारास चार अज्ञात इसमांनी बँकेच्या एटीएम मशीनला महिंद्रा थार गाडीला बांधून ओढण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच स्क्रू ड्रायव्हरने एटीएमचे कव्हर उचकटण्याचा प्रयत्न केला आहे. केबिनमधील कॅमेरे देखील फोडण्यात आले आहे. चोरट्यांना चोरी करणे शक्य न झाल्यामुळे त्यांनी ताबडतोब पळ काढला. याप्रकारे बँकेच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. अद्याप आरोपी फरार असून त्यांचा देखील शोध घेत आहे. या चोरीची छत्रपती संभाजीनगर परिसरात चर्चा होत आहे.