डॉक्टरचा तरुणीवर बलात्कार (Photo : Molestation)
लाखनी : लाखनी येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका प्रशिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रशिक्षकाने विद्यार्थिनीला वारंवार फोन व व्हॉट्सअॅपवर अश्लील संदेश पाठवून त्रास दिला. तसेच, तिच्या नातेवाईकांनी समजवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यासोबत शिवीगाळ करून धमकी दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी लाखनी पोलिस ठाण्यात आरोपी संजय हिवराज बिसेन (35, रा. सिंधीपार/मुंडीपार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाखनी हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. पीडित विद्यार्थिनी शहरातील नामांकित करिअर अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. आरोपी संजय बिसेनही त्याच अकॅडमीत गणित व बुद्धीमत्ता विषयाचा प्रशिक्षक आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षकाने विद्यार्थिनीच्या मोबाइलवर रात्री अपरात्री फोन करून अश्लील संदेश पाठवण्यास सुरुवात केली. यामुळे पीडितेने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. मुलीच्या नातेवाईकांनी प्रशिक्षकाला समजावण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांच्यावर शिवीगाळ करून धमकी दिली. त्यामुळे पीडितेने अखेर लाखनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पीडितेच्या तक्रारीवरून लाखनी पोलिस ठाण्यात प्रशिक्षक संजय बिसेन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
दिव्यांग मुलीचा विनयभंग
15 वर्षीय दिव्यांग मुलीची आई सकाळी 10 वाजताच्या सुमारास गावातील कांता साहेबराव खाडे यांच्या शेतातील हरभरा घाटे वेचण्याकरिता गेली होती. काम करून दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान शेतातून घरी येत असताना तिला तिची दिव्यांग अल्पवयीन मुलगी व शेजारी राहणारा दिनकर देवराव लहाने हे दोघे तिला तिच्या गोठ्यात जात असताना दिसले. त्यावेळी पीडितेची आई सुद्धा त्यांच्या मागे गोठ्यात गेली. यावेळी वाईट उद्देशाने दिनकर लहाने याने दिव्यांग अल्पवयीन मुलीचा हात धरला होता. पीडितेच्या आईने मुलीचा हात कशाला धरला? असा आवाज ऐकून नराधम मुलीचा हात सोडून निघून गेला.
पाठलाग करून विनयभंग
एका तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्यात आला. खासगी दवाखान्यातील डॉक्टरच्या केबिनमध्ये शिरून गोंधळ घालून छेड काढण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि.14) कोतवाली ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपी अमन रौराडेविरुद्ध गुन्हा दाखल केला. पीडित 22 वर्षीय तरुणीशी जवळपास अकरा महिन्यांपूर्वी अमन रौराडे याच्याशी जिल्हा सामान्य रुग्णालयात ओळख झाली.