crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
गडचोरोली: गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेऊन ही हत्या करण्यात आल्याच्या समोर आले आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोनापूर गावजवळील जंगल परिसरात घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहिती नुसार, मृतकाचे आणावं टामिनबाई पुरुषोत्तम कचलाम (वय 34) असे आहे. आरोपी पतीचे नाव पुरुषोत्तम गजराज कचलाम (वय 34, रा. सोनपूर) आहे. या दाम्पत्याचे सुमारे दहा वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना नऊ आणि पाच वर्षांचे दोन लहान मुलं आहेत. आईच्या मृत्यूनंतर या निष्पाप मुलांवर दुःखाचे सावट कोसळले आहे.
कशी करण्यात आली हत्या?
आरोपी पुरुषोत्तम हा स्वभावाने चिडचिडा व संशयी असून, तो पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार शंका घेत असे. त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते. 31 ऑगस्ट रोजी दोघांमध्ये जोरदार वाद झाला, त्यानंतर 1 सप्टेंबर रोजी पुरुषोत्तमने पत्नीला माहेरी सोडण्याच्या बहाण्याने पायी घेऊन निघाला. सोनपूर-गोडगुलदरम्यानच्या कामेली जंगल परिसरात पोहोचल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. संतप्त झालेल्या पुरुषोत्तमने पत्नीला जमिनीवर पाडून तिच्या छातीवर बसत गळा दाबून तिचा खून केला.
गावकऱ्यांसमोर कबुली
पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी गावात परतला आणि दारूच्या नशेतच गावकऱ्यांसमोर पत्नीला ठार केल्याची कबुली दिली. यानंतर गावकऱ्यांनी याची माहिती मृतकाच्या आई चमरीबाई बोगा (रा. चौकी, जि. मानपूर-मोहला, छत्तीसगड) यांना दिली. त्यांनी 3 सप्टेंबर रोजी कोटगुल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांची कारवाई
तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोरची ग्रामीण रुग्णालयात हलवला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीस सोनपूर येथील एका शेतातून अटक केली. या प्रकरणात आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम 302 (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरची पोलिस पुढील तपास करत असून, या घटनेमुळे स्थानिक पातळीवर संतापाचे वातावरण आहे. दारू व घरगुती हिंसाचारामुळे होणाऱ्या अशा घटनांवर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
५००० कोटी रुपयांच्याड्रग्सचा भांडाफोड, मीरा भाईंदर पोलिसांची हैदराबादमध्ये मोठी कारवाई