मीरा भाईंदर : वसई विरार पोलिसांनी ड्रग्स फॅक्टरीचा भांडाफोड करण्यात आला आहे. पोलिसांनी हैदराबाद येथील ड्रग्स फॅक्टरीवर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. मीरा रोडमधील एमडी ड्रग्सच्या एका प्रकरणात तपास सुरू असताना हैदराबाद कनेक्शन सामोर आले. दरम्यान, मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिटने १४ पोलिसांना सोबत घेऊन हैदराबाद येथे छापेमारी केली आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्स किंमत 5000 कोटी असल्याची माहिती मिळाली आहे. ही कारवाई शुक्रवारी (5 सप्टेंबर 2025) ला करण्यात आली.
Nude Gang: ‘न्यूड गँग’ची दहशत, शेतातून खेचून महिलांना…ड्रोनद्वारे पोलीस घेताहेत शोध
या छापेमारीत एमडी ड्रग्ससह त्यासाठी लागणारे इतर केमिकल व ड्रग बनवण्यासाठी लागणारे साहित्य तसेच करोडो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एमडी ड्रग्स बनवणाऱ्या कारखाना मालकास पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. रचकोंडा येथील चेरलापल्ली एमआयडीसीमध्ये मीरा भाईंदर पोलिसांनी हा मोठा ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त केला. तेलंगणातील ड्रग्जची एकूण किंमत सुमारे 5000 कोटी आहे.
ज्योतिर्लिंग मंदिरातील चोरीचा तीन दिवसांत उलगडा; आरोपीला ठोकल्या बेड्या
वडूज शहरातील श्री ज्योतिबा मंदिरातून पितळेची मूर्ती चोरीला गेल्याची घटना रविवार, ३१ ऑगस्ट रोजी घडली होती. या घटनेमुळे वडूज शहरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेची नोंद वडूज पोलिस ठाण्यात झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत केवळ तीन दिवसांत आरोपीला जेरबंद करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. दीपक शहाजी माने (वय २८, रा. वडूज) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या आईकडे ठेवलेली चोरीची मूर्ती देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
३१ ऑगस्ट रोजी वडूज-कराड रस्त्यावरील श्री ज्योतिबा मंदिरातील पितळेची मूर्ती चोरीला गेल्याची फिर्याद पुजारी दिलीप कृष्णा गोडसे यांनी दिली होती. तपासादरम्यान मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयिताचा चेहरा स्पष्ट दिसून आला. त्यावरून तो वडूज बसस्थानक परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस कर्मचारी गणेश शिरकुळे, कुंडलिक कटरे, सागर बदडे, वाहतूक शाखेतील अजय भोसले व गजानन वाघमारे यांनी संशयिताला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली देत मूर्ती आईकडे ठेवली असल्याचे सांगितले.
आरोपीच्या आईकडून मूर्ती हस्तगत
यानंतर पोलिसांनी दीपकची आई जया माने हिचा शोध घेतला. वडूज-दहिवडी रोडवर त्या मिळाल्यानंतर चौकशीत जुन्या कपड्यांमध्ये गुंडाळलेली पितळेची मूर्ती त्यांच्या जवळ असल्याचे उघड झाले. पोलिसांनी मूर्ती जप्त करून मुद्देमाल हस्तगत केला.
ज्योतिर्लिंग मंदिरातील चोरीचा तीन दिवसांत उलगडा; आरोपीला ठोकल्या बेड्या