
crime (फोटो सौजन्य: social media)
Akola Crime : ‘रक्षकच भक्षक?’ महामार्गावर तरुणीचा पाठलाग; अश्लील बोलणे व हातवारे, पोलीस अधिकारी अटक
नेमकं काय घडलं?
काल (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज माघार घेण्यावरून भाजप उमेदवार शालन शिंदे आणि भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांच्या कुटुंबियांत वाद झाला होता. पोलीसात दाखल तक्रारीनुसार अपक्ष उमेदवार रेखा सरवदे यांनी अर्ज माघार घेतल्यानंतर शालन शिंदे यांच्या कुटुंबियांनी सरवदे यांना डिवचणारे स्टेट्स ठेवले. याच वादातून शालन शिंदे आणि रेखा सरवदे यांच्या कुटुंबियांत भांडण झालं, या भांडणादरम्यान बाळासाहेब यांच्यावर धारदार शास्त्राने वार करण्यात आले. यात बाळासाहेब हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
१५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी मयत बाळासाहेब याचा भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे याच्या फिर्यादीवरून सोलापूरच्या जेलरोड पोलीस ठाण्यात 15 जणांविरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला. बीएनएस कलम 103, 109, 189 (1),(2), 190, 191(2),(3), 49, 352, 351(2), शस्त्र अधिनियम 4, 25 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रभाग 2 मधील भाजप उमेदवार शालन शिंदे, तीचे पती शंकर शिंदे यांच्यासह एकूण 5 जणांना ताब्यात घेण्यात आलंय.
मनसेच्या पदाधिकाऱ्याने केले गंभीर आरोप
याहत्या प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका आणि प्रभाग 2 च्या उमेदवारासह 15 जणावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. भाजपच्या राजकारणात आमदार किरण देशमुखने आपला उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याासाठी बाळासाहेब सरवदे यांचा बळी घेतलाय असा गंभीर आरोप करण्यात आला. विजय देशमुख यांची आमदारकी रद्द केली पाहिजे, आणि किरण देशमुखला बेड्या ठोकल्या पाहिजे. तसेच भाजपच्या माजी नगरसेविका, प्रभाग 2 मधील उमेदवार शालन शिंदे, तीचा पती शंकर शिंदे, बाबू शिंदे, विशाल शंकर शिंदे, आशिष शंकर शिंदे, सुनिल शंकर शिंदे, अमर शंकर शिंदे या सगळ्यांनी मिळून सरवदेंचा खून केला आहे. या घटनेला भाजप आमदार विजय देशमुख आणि त्यांचा मुलगा किरण देशमुख जबाबदार आहे, असे खळबळजनक आरोप मनसेचे पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी केले आहेत.
Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
Ans: ते मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि पक्षातील सक्रिय पदाधिकारी होते.
Ans: उमेदवारी अर्ज माघारी आणि राजकीय वादातून ही हत्या झाल्याचा आरोप आहे.
Ans: भाजपच्या उमेदवारासह एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे.