crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
अमरावती: अमरावतीच्या परतवाड्यात मुंबई, नागपूर आणि अमरावती क्राईम ब्रांच पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. ती कारवाई म्हणजे पोलिसांनी दोन ठिकाणाहून १३ जणांना अटक करण्यात आली होती. यात आंतरराष्ट्रीय बिश्रोई गॅंगशी संबंधित एक आरोपी असल्याचा पोलीसांना माहिती मिळाली होती. मात्र तपासाअंती पोलिसांनी पकडण्यात आलेल्या सर्व संशयितांना सोडण्यात आलं. म्ह्णून हि कारवाई फसली का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.
Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार
प्रकरण काय नेमके?
मुंबई, नागपूर आणि अमरावती क्राईम ब्रांच पोलिसांनी परतवाडा शहरात संयुक्तिक कारवाई करत 13 जणांना ताब्यात घेतले. यात आंतरराष्ट्रीय बिश्रोई गॅंगशी संबंधित एक आरोपी असल्याचा पोलीसांना माहिती मिळाली होती. त्याचा नाव वांटेड कुणाल राणा असे असल्याचे समोर आले. त्याच लोकेशन परतवाडा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाल. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्याचा अनुषंगाने आणि त्यांच्याकडे शस्त्र असण्याच्या संशयाने पोलीसांनी वार्निंग शॉट फायर करत हवेत गोळीबार ही केला. त्यामुळे संपूर्ण परतवाडा शहरात एकच खळबळ उडाली होती.
पात्रात काय?
तर काल दिवसभर पोलिसांनी 13 जणांची परतवाडा पोलीस ठाण्यात चौकशी झाल्यावर सायंकाळी अमरावती ग्रामीण पोलीसांनी पत्रक काढलय. त्या पत्रात १३ आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले १३ जणांमध्ये वॉन्टेड कुणाल राणा नसल्याचे चाहलूअसहित समोर आले आहे. त्यामुळे ताब्यात घेण्यात आलेल्या इसमापैकी एक यांच्यात नाम साधर्म्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीसांनी सगळ्या संशयितांना सोडल्याची माहिती देण्यात आली.
एक्स गर्लफ्रेंडचे ठरले लग्न, संतापलेल्या प्रियकराने थेट मुलीच्या आई वडिलांवर केला जीवघेणा हल्ला
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. एक्स गर्लफ्रेंडचे लग्न ठरल्याने एका तरुणाने थेट मुलीच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. यात तरुणीचे वडील गंभीर जखमी झाले असून आई देखील जखमी झाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव भारत (32) असे आहे.
त्याचे एका मुलीसोबत पूर्वी प्रेमसंबंध होते. गेल्या वर्षी त्याने त्या मुलीला पळवून नेले होते. त्यावेळी ती मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात होता. मुलीला तेलंगणातून परत आणण्यात आला होता. त्याला तीन महिने तुरुंगवास देखील भोगावे लागले होते. काही दिवसांपूर्वी ती मुलगी १८ वर्षांची झाली आणि कुटुंबीयांनी तिच्या लग्नाची बोलणी सुरु केली. सोमवारी दुपारी एका मुलाने तिला पाहण्यासाठी घर गाठले. हे त्याला समजताच माजी प्रियकर भारत संतापल. धारदार शास्त्रांनी वार करून हल्ला केला. ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यांच्या हात, डोके आणि बोटांना दुखापत झाली आहे. मुलीच्या आईने पतीच्या मदतीसाठी धाव घेतली तेव्हा तिलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार