गौतमी पाटीलच्या अडचणी वाढण्याची शक्यता (फोटो- सोशल मीडिया)
गौतमी पाटीलच्या अडचणी वाढण्याची शक्यता
गौतमी पाटीलच्या वाहनाने रिक्षाला दिलेली धडक
रिक्षाचालकाचा आरोपामुळे प्रकरण तापणार
Pune Crime News: नृत्यांगना गौतमी पाटील ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे. तरुणाईमध्ये तिची प्रसिद्धी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तरुण मंडळी तिच्या कार्यक्रमांना तूफान गर्दी करतात हे आपल्याला पाहायला मिळते. मात्र या लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात तिला अटक होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. हे प्रकरण नेमके काय आहे ते जाणून घेऊयात.
गौतमी पाटील एका वेगळ्याच प्रकरणात चर्चेत आली आहे. हे प्रकरण पुण्यातील असल्याचे म्हटले जात आहे. हे प्रकरण एका अपघाताशी सबंधित आहे. गौतमी पाटीलच्या कारने पुण्यात एका रिक्षाला जोरदार धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालकासह ३ जण जखमी झाले होते. याबाबत आता रिक्षा चालकाच्या कुटुंबाने काही आरोप केले आहेत.
पुण्यातील पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळ गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षा चालक आणि बसलेले प्रवासी जखमी झाले. रिक्षा चालकावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हा अपघात घडला तेव्हा गौतमी पाटील गाडीत बसलेली नव्हती असे समोर येत आहे.
घडलेल्या अपघाताची गौतमी पाटील किंवा त्यांच्या टीमने कोणतीही दखल घेतली नाही. कसलीही चौकशी किंवा कोणत्याही प्रकारचा मेसेज आलेला नसल्याचे रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी सांगितले. कुटुंबियांनी पोलिसांकडे अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमके काय घडणार हे देखील पहावे लागणार आहे.
नेमके काय घडले?
पुण्यात गौतमी पाटीच्या कारने पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातााच्या वेळी गौतमी कारमध्ये नव्हती. ड्रायव्हर कार चालवत होता. पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ ही घटना घडली. एका हॉटेलसमोर रिक्षाचालक उभा होता. रिक्षामध्ये दोन प्रवासी होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या गौतमीच्या गाडीने रिक्षाला जोराची पाठीमागून धडक दिली. ही धडक इतक्या जोरात दिली गेली होती की, रिक्षा काही अंतरापर्यंत पुढे गेली. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ३ जण जखमी झाले आहेत.
गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल
या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी झाले आहे. अपघात झाल्यानंतर तातडीने लोक धावून आले. त्यांनी जखमी रिक्षाचालक आणि प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आणि आता त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लिसांनी गौतमी पाटील हिच्या कार चालकाला ताब्यात घेतले आहे.