Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tasgaon Crime News: तासगाव पोलिसांची मोठी कामगिरी! ट्रॅक्टर, ट्रॉली चोरणारी टोळी पकडली; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

हातनूर (ता. तासगाव) येथील दत्तात्रय नामदेव पवार यांच्या घराजवळून २६ एप्रिल रोजी एक डंपींग ट्रॉली अज्ञाताने चोरून नेली होती. त्यांनी याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 05, 2025 | 02:35 AM
Tasgaon Crime News: तासगाव पोलिसांची मोठी कामगिरी! ट्रॅक्टर, ट्रॉली चोरणारी टोळी पकडली; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
Follow Us
Follow Us:
तासगाव: तासगाव व खानापूर तालुक्यातून ट्रॅक्टर व ट्रॉलीची चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात तासगाव पोलीस ठाण्यातील डीबी पथकाला यश आले आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना बामणी व मंगरुळ (ता. खानापूर) येथून ताब्यात घेण्यात आले. तर उर्वरित दोघेजण परागंदा आहेत. या टोळीकडून पोलिसांनी सुमारे १३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये तीन ट्रॉल्या, दोन ट्रॅक्टरचा समावेश आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये यशराज अभिजीत माळी (वय १९, रा. बामणी, ता. खानापूर), सागर आप्पासो शिंदे (वय २४, रा. मंगरुळ, ता. खानापूर), सार्थक राजेंद्र भंडारे (रा. धामणी, ता. तासगाव), आदित्य सुनिल निकम (रा. शिरगाव वांगी, ता. कडेगाव) यांचा समावेश आहे. यातील यशराज माळी व सागर शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नोटीसवर सोडले आहे. उर्वरित दोघेजण परागंदा आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
हातनूर (ता. तासगाव) येथील दत्तात्रय नामदेव पवार यांच्या घराजवळून २६ एप्रिल रोजी एक डंपींग ट्रॉली अज्ञाताने चोरून नेली होती. त्यांनी याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या चोरीचा कसून तपास करण्याच्या सूचना पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिल्या होत्या. त्यानुसार तासगाव पोलीस ठाण्यातील डीबी पथक चोरट्यांच्या मागावर होते.
तपासादरम्यान या  पथकातील अमोल चव्हाण यांना गोपनीय बातमीदाराकडून चोरट्यांबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, प्रशांत चव्हाण, विवेक यादव, विठ्ठल सानप, सुरेश भोसले यांनी बामणी येथून यशराज माळी व मंगरुळ येथून सागर शिंदे यांच्या मुसक्या आवळ्या. त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर, तीन ट्रॉल्या असा सुमारे १३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चोरट्यांकडून खानापूर तालुक्यातील चोरीचीही उकल करण्यात आली आहे. याकामी सांगली पोलीस ठाण्यातील सायबर विभागातील अजय पाटील व अभिजीत पाटील यांची मदत तासगाव पोलीसांना मिळाली.

Web Title: Tasgaon police arrested accused stolen tractor and trolly seized 13 lakh crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • crime news
  • Tasgaon Crime
  • Tasgaon Police

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.