Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इनपूट टॅक्स क्रेडिट प्रकरणात मोठी अपडेट: २० कोटींची करचोरी उघड; आरोपीला कोर्टाने दिली ‘ही’ शिक्षा

ही कारवाई राज्य वस्तू व सेवा कर विभागामार्फत बनावट बीजक व खोट्या व्यवहारांद्वारे केली जाणारी करचोरी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या विशेष तपास मोहिमेअंतर्गत करण्यात आली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 23, 2025 | 09:33 PM
इनपूट टॅक्स क्रेडिट प्रकरणात मोठी अपडेट: २० कोटींची करचोरी उघड; आरोपीला कोर्टाने दिली ‘ही’ शिक्षा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागामार्फत मेसर्स सूर्या एंटरप्रायजेस या व्यापार संस्थेविरोधात सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने एकूण २०.२० कोटी रुपयांच्या बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट (ITC) प्रकरणात संस्थेचे मालक निखिल नरेश वालेचा (वय २८ वर्षे) यास अटक करण्यात आली आहे.

ही व्यापार संस्था दि. ८ सप्टेंबर, २०२१ रोजी वस्तू व सेवा कर कायद्यान्वये नोंदणीकृत झाली असून, संबंधित व्यक्तीने कोणतीही वस्तू अथवा सेवा प्रत्यक्षात न प्राप्त करता, तसेच कोणत्याही वस्तूंची देवाण-घेवाण न करता, फसवणूक करणाऱ्या पद्धतीने बनावट बीजकांच्या आधारे ITC प्राप्त केल्याचे निदर्शनास आले आहे.

तपासादरम्यान व्यापाराच्या नोंदणीकृत पत्त्यावर भेट दिल्यानंतर असे आढळून आले की, आरोपीने १७.०३ कोटी रुपयांचे बनावट ITC अस्तित्वात नसलेल्या संस्थांच्या माध्यमातून प्राप्त केले असून, ३.०३ कोटी रुपयांचे अतिरिक्त ITC चुकीच्या पद्धतीने GST विवरणपत्रांमध्ये दाखविण्यात आले होते. या व्यवहारांसाठी कोणतीही वस्तू अथवा सेवा प्रत्यक्षात प्राप्त झालेली नव्हती. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, उल्हासनगर यांनी निखिल वालेचा यास दि. ३० जुलै २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई राज्य वस्तू व सेवा कर विभागामार्फत बनावट बीजक व खोट्या व्यवहारांद्वारे केली जाणारी करचोरी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या विशेष तपास मोहिमेअंतर्गत करण्यात आली. कारवाई राज्यकर सहायक आयुक्त संतोष लोंढे, कर अधिकारी दीप्ती पिलारे, सुजीत कक्कड, संतोष खेडकर तसेच निरीक्षक व कर सहाय्यक यांच्या विशेष पथकाच्या मदतीने करण्यात आली.

संपूर्ण तपास राज्यकर सह आयुक्त (अन्वेषण-क), मुंबई यांच्या आदेशानुसार व राज्यकर उपआयुक्त यास्मीन अजीम मोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आला. ही कारवाई चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील राज्य जीएसटी विभागाची पाचवी अटक असून, करचोरी, बनावट बीजक निर्मिती, खोट्या उलाढाली दाखविणे व बेकायदेशीरपणे ITC मिळविणे अथवा हस्तांतरित करणे यांच्याविरोधात विभागाने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.

इनपूट टॅक्स क्रेडिट प्रकरणी दोन आरोपींना अटक

राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागामार्फत बोगस बिलिंग प्रकरणी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मे. अ‍ॅक्युरेट एंटरप्रायजेस (GSTIN: 27AAZFA6898H2ZE) या भागीदारी व्यवसायाविरुद्ध तपासात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान बनावट खरेदी दाखवून वस्तू व सेवा करांतर्गत खोटी कर सवलत (इनपुट टॅक्स क्रेडिट) घेऊन सुमारे रुपये ९.१९ कोटींची महसूल हानी करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

Web Title: Tax evasion of rs 20 crores exposed in input tax credit case accused in police custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 09:33 PM

Topics:  

  • crime
  • cyber crime
  • online fraud
  • tax

संबंधित बातम्या

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश
1

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
2

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

पावसात हेडफोन घालून जाणं एका १७ वर्षीय तरुणाच्या जिवावर बेतलं; महावितरणाच्या हाय टेन्शन वायरने लागला शॉक,मुंबईतील घटना
3

पावसात हेडफोन घालून जाणं एका १७ वर्षीय तरुणाच्या जिवावर बेतलं; महावितरणाच्या हाय टेन्शन वायरने लागला शॉक,मुंबईतील घटना

संतापजनक! मावस भावानेच केला तरुणीवर अत्याचार, मावशीच्या नातेवाईकांकडून धमकी, तरुणीने संपावले जीवन
4

संतापजनक! मावस भावानेच केला तरुणीवर अत्याचार, मावशीच्या नातेवाईकांकडून धमकी, तरुणीने संपावले जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.