Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News : अकोल्यातील शिक्षक व विद्यार्थ्याचा काशीद बीचवर बुडून मृत्यू; शैक्षणिक सहलीचा आनंद बदलला शोकात

रायगडच्या काशीद बीचवर अकोल्यातील शुअर विन क्लासेसच्या सहलीदरम्यान दुर्दैवी घटना घडली. समुद्रात पोहत असताना लाटेमुळे शिक्षक राम कुटे आणि विद्यार्थी आयुष रामटेके बुडून मृत्यूमुखी पडले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 09, 2025 | 02:38 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • काशीद बीचवर दुर्दैवी घटना
  • शिक्षक-विद्यार्थीचा मृत्यू
  • शिक्षणक्षेत्रात हळहळ व्यक्त

अकोला: अकोल्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध काशीद बीचवर अकोल्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा गट शैक्षणिक सहलीसाठी गेला होता. मात्र या आनंददायी सहलीत असा एक अनर्थ घडला की सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. समुद्रात पोहत असताना अचानक आलेल्या लाटेमुळे एक शिक्षक आणि एक विद्यार्थी पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडले.

Uttar Pradesh: आईने केला जावयावर खोटा हत्येचा आरोप; पण मुलगी जिवंत, दुसऱ्याशी लग्न करत…

काय घडलं नेमकं?

अकोल्यातील सुप्रसिद्ध शुअर विन क्लासेसचे १२ विद्यार्थी आणि ३ शिक्षक असे एकूण १५ जण शैक्षणिक सहलीसाठी शनिवारी रायगड जिल्ह्यातील काशीद बीचवर गेले होते. सहलीदरम्यान काही विद्यार्थी समुद्रात पोहत असताना अचानक मोठी लाट आली आणि दोन विद्यार्थी तसेच एक शिक्षक पाण्यात ओढले गेले. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले, परंतु त्यात शिक्षक आणि एका विद्यार्थ्याला वाचवण्यात अपयश आले.

या घटनेत शिक्षक राम कुटे (वय ६०, रा. सुधीर कॉलनी, जवाहरनगर, अकोला) आणि विद्यार्थी आयुष रामटेके (वय १९, अकोला) यांचा मृत्यू झाला आहे. आणखी एक विद्यार्थी आयुष बोबडे (वय १७) सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी दिली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, राम कुटे यांचा मृतदेह बोर्ली येथे आणि आयुष रामटेकेचा मृतदेह मुरुड प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आला आहे.

शिक्षकांचा मृत्यू शिक्षणविश्वासाठी धक्का:
राम कुटे हे अकोल्यातील नामांकित शुअर विन क्लासेसचे संचालक आणि लोकप्रिय शिक्षक होते. त्यांनी बारा ज्योर्तिलिंग परिसरात क्लास सुरू करून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे मार्गदर्शन दिले. नंतर त्यांनी तोष्णीवाल लेआऊट आणि बुलढाणा येथे नवीन शाखा सुरू केल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले.

त्यांच्या अकस्मात निधनाने अकोल्याच्या शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि पालक वर्ग यांच्यात दुःखाचे वातावरण आहे. कुटे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. प्रशासनाने या दुर्घटनेबाबत चौकशी सुरू केली असून, काशीद बीचवरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कराड पोलिसांची मोठी कारवाई; सापळा रचून दोघांना पकडले अन्…

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणत्या बीचवर घटना घडली?

    Ans: काशीद

  • Que: मृत शिक्षकाचे नाव काय?

    Ans: राम कुटे

  • Que: मृत विद्यार्थ्याचे नाव काय?

    Ans: आयुष

Web Title: Teacher and student from akola drown at kashid beach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 02:36 PM

Topics:  

  • Akola
  • crime

संबंधित बातम्या

Uttar Pradesh: आईने केला जावयावर खोटा हत्येचा आरोप; पण मुलगी जिवंत, दुसऱ्याशी लग्न करत…
1

Uttar Pradesh: आईने केला जावयावर खोटा हत्येचा आरोप; पण मुलगी जिवंत, दुसऱ्याशी लग्न करत…

Tamilnadu Crime: आईच झाली खुनी! महिला प्रेयसीसोबतचे नाते टिकवण्यासाठी ५ महिन्याच्या मुलाचा गळा दाबला,
2

Tamilnadu Crime: आईच झाली खुनी! महिला प्रेयसीसोबतचे नाते टिकवण्यासाठी ५ महिन्याच्या मुलाचा गळा दाबला,

Nashik Crime: सासरच्या छळाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी सासरच्या दारातच पेटवली चिता
3

Nashik Crime: सासरच्या छळाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी सासरच्या दारातच पेटवली चिता

Nanded Crime: नांदेड हादरलं! शिकवणीतून परतणाऱ्या ६ वर्षांच्या चिमुकलीचे तोडले लचके, फाशीची मागणी
4

Nanded Crime: नांदेड हादरलं! शिकवणीतून परतणाऱ्या ६ वर्षांच्या चिमुकलीचे तोडले लचके, फाशीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.