Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madha Accident News: दुर्दैवी ! टेंभुर्णी रोडवर भीषण अपघात : तीन युवकांचा मृत्यू, दोन जखमी

या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या प्रशांत कुंडलिक खडतरे यांचा आजच वाढदिवस होता. विशेष म्हणजे त्यांच्या भावाचे लग्न ठरल्याने ते पत्रिका वाटपासाठी सोलापूरला गेले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 09, 2025 | 11:38 AM
Madha Accident News: दुर्दैवी ! टेंभुर्णी रोडवर भीषण अपघात : तीन युवकांचा मृत्यू, दोन जखमी
Follow Us
Close
Follow Us:

टेंभुर्णी,  माढा : अकलूज-टेंभुर्णी रस्त्यावर मस्के वस्तीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक होती. हा अपघात रविवार, ८ जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये ओंकार बाबासाहेब शिंदे (वय १८, रा. करकंब, ता. पंढरपूर), प्रशांत कुंडलिक खडतरे (वय २२, रा. अकलूज, ता. माळशिरस) आणि निखिल अनिल वंजारे (वय २०, रा. करकंब, ता. पंढरपूर) यांचा समावेश आहे. सुरज अरुण लोखंडे (वय १८, रा. उपरी, ता. पंढरपूर), दयानंद उर्फ बंटी जाधव (वय २२, रा. अकलूज), आणि प्रशांत खडतरे हे तिघे एमएच ४५ एडब्ल्यू २६४९ या क्रमांकाच्या दुचाकीवरून अकलूजच्या दिशेने जात होते.

Mumbai Local : मोठी बातमी! धावत्या लोकलमधून 8 ते 12 प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ पडले; 6 जणांचा मृत्यू, दोन गंभीर

दरम्यान, टेंभुर्णीपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मस्के वस्तीजवळ समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकी (क्रमांक एमएच १३ ईआर २९०६) वर ओंकार शिंदे व निखिल वंजारे हे दोघे येत होते. दोन्ही दुचाकींमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. यात प्रशांत खडतरे याचा जागीच मृत्यू झाला. ओंकार शिंदे याला उपचारासाठी टेंभुर्णी येथे नेण्यात आले, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निखिल वंजारे याच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याला तातडीने सोलापूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या अपघातात सुरज लोखंडे आणि दयानंद जाधव हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. रात्री उशिरा पर्यंत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळी उठल्यानंतर पोट होईल क्षणार्धात स्वच्छ! रात्री झोपण्याआधी करा ‘या’ गोड पदार्थाचे सेवन, सांधेदुखी होईल

या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या प्रशांत कुंडलिक खडतरे यांचा आजच वाढदिवस होता. विशेष म्हणजे त्यांच्या भावाचे लग्न ठरल्याने ते पत्रिका वाटपासाठी सोलापूरला गेले होते. काम आटोपून ते घरी परतत असताना वाटेतच अपघात घडला आणि त्यांच्या वाढदिवसाच्याच दिवशी मृत्यूने त्यांना गाठले. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Terrible accident on tembhurni road three youths killed two injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 11:38 AM

Topics:  

  • Accident News
  • Madha

संबंधित बातम्या

मूल-चिचाळा रस्त्यावर भीषण अपघात; कार-दुचाकीमध्ये जोरदार धडक, दोघांचा मृत्यू
1

मूल-चिचाळा रस्त्यावर भीषण अपघात; कार-दुचाकीमध्ये जोरदार धडक, दोघांचा मृत्यू

राजस्थानच्या फतेहपूरमध्ये बस-ट्रकमध्ये भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू तर 18 जण जखमी
2

राजस्थानच्या फतेहपूरमध्ये बस-ट्रकमध्ये भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू तर 18 जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.