Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Terrorist Arrested: कुख्यात दहशतवादी ‘हुझैफा’ जेरबंद; ३ दिवसांचे सर्च ऑपरेशन यशस्वी

Terrorist Huzaifa arrested: हुझैफाच्या अटकेनंतर अंडरवर्ल्ड आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित कथित ‘स्लीपर सेल’ नेटवर्कबाबत तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. तपास यंत्रणा आता त्याच्या संपर्कातील व्यक्ती, आर्थिक व्यवहार आणि संभाव्य कटाच्या व्याप्तीचा शोध घेत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 03, 2026 | 09:58 AM
Terrorist Huzaifa arrested Mumbai

Terrorist Huzaifa arrested Mumbai

Follow Us
Follow Us:

Terrorist Arrested: मुंबईत दहशतवादी हल्ला आणि घातपाताचा कट उधळून लावण्यात तपास यंत्रणांना मोठे यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला ‘हुझैफा’ हा कुख्यात दहशतवादी तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकला आहे. मुंबई पोलिसांच्या तपास यंत्रणांचे हे मोठे यश मानले जात आहे. त्याचबरोबर मुंबई पुन्हा एका मोठ्या संकटातूनही वाचल्याचे बोलले जात आहे.

ATS आणि दिल्ली पोलिसांची संयुक्त धडाकेबाज कामगिरी

मिळालेल्या माहितीनुसार, ही मोठी कारवाई ‘महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक’ (Maharashtra ATS) आणि दिल्ली पोलिसांच्या ‘स्पेशल सेल’ने (Delhi Police Special Cell) अत्यंत गुप्तपणे आणि संयुक्तपणे केली आहे. हुझैफा हा देशाच्या राजधानीत आणि आर्थिक राजधानीत समांतरपणे कारवाया करण्याच्या तयारीत होता, मात्र तपास यंत्रणांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा डाव पुरता उधळला गेला आहे.

Junior College Teachers: शिक्षण विभागाच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा संताप!

३ दिवसांचे सर्च ऑपरेशन आणि अटक

दहशतवादी हुझैफा हा अत्यंत हुशारीने आणि वारंवार आपले ठिकाण बदलून पोलिसांना चकवा देत होता. त्याचे गांभीर्य ओळखून त्याला पकडण्यासाठी गेल्या ३ दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात विविध संशयास्पद ठिकाणी कसून छापे टाकले जात होते. एटीएस आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकांनी रात्रंदिवस राबवलेल्या या धडाकेबाज शोधमोहिमेनंतर (Search Operation) अखेर ३ व्या दिवशी हुझैफाला मुंबईच्या एका भागातून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

अंडरवर्ल्ड आणि दहशतवाद्यांचे कनेक्शन तपासणार

हुझैफाच्या अटकेमुळे अंडरवर्ल्ड आणि परदेशी दहशतवादी संघटनांचे मुंबईतील नेटवर्क पुन्हा एकदा समोर आले आहे. हुझैफाला मुंबईत कोणी आश्रय दिला होता? त्याच्याकडे कोणती शस्त्रे किंवा स्फोटके आली होती का? आणि मुंबईत कोणती ठिकाणे त्याच्या निशाण्यावर होती? या सर्व बाबींचा शोध घेण्यासाठी पोलीस आता त्याची कसून चौकशी करत आहेत. या चौकशीतून अनेक मोठे खुलासे होण्याची आणि इतर काही संशयितांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Share Market Today: अशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात! तज्ज्ञांनी दिला सावध राहण्याचा इशारा

रेल्वेच्या अतिक्रमण कारवाईचा बदला घेण्याचा होता कट

या दहशतवादी कटामागचे एक धक्कादायक कारणही समोर आली आहे. मुंबईत रेल्वेच्या जागेवर झालेले एक अतिक्रमण हटवण्यासाठी काही दिवसांपूर्वी प्रशासनाने मोठी कारवाई केली होती. याच अतिक्रमण हटाव कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी आणि रेल्वे परिसरामध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचे नियोजन केले होते. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, हा संपूर्ण कट पाकिस्तानातील कराचीतून एक मुख्य सुत्रधार ऑपरेट करत होता. असेही तपासातून समोर आले आहे

भारतात अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत आहेत. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, मुन्ना झिंगाडा हा या नेटवर्कचा प्रमुख हँडलर असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या सूचनेनुसार आरोपी हुझैफावर मुंबई आणि परिसरात स्थानिक स्तरावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना एकत्र करणे, तरुणांचे कट्टरपंथीकरण करणे आणि घातपाती कारवायांसाठी आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

 

 

Web Title: Terrorist huzaifa arrested mumbai maharashtra ats delhi police joint operation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • ats
  • maharashtra news
  • Mumbai News

संबंधित बातम्या

NCPA कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; दरमहा ₹7,250 वेतनवाढ, ₹50 हजार वार्षिक बोनस, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण करार
1

NCPA कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; दरमहा ₹7,250 वेतनवाढ, ₹50 हजार वार्षिक बोनस, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण करार

Jalgaon News: गोविंदा आला रे…! जळगावात नारीशक्तीचा जल्लोष, 685 युवती फोडणार 15 दहीहंड्या, तयारी जोरात
2

Jalgaon News: गोविंदा आला रे…! जळगावात नारीशक्तीचा जल्लोष, 685 युवती फोडणार 15 दहीहंड्या, तयारी जोरात

BMC कडून मुलुंडमध्ये ‘Pedestrian First’ मोहिमेअंतर्गत अतिक्रमणाविरोधात कारवाई…
3

BMC कडून मुलुंडमध्ये ‘Pedestrian First’ मोहिमेअंतर्गत अतिक्रमणाविरोधात कारवाई…

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग
4

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.