Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईतील ८७ बेकऱ्यांवर कारवाईचा बडगा? लाकूड-कोळशाचा वापर बंद करण्यासाठी पालिका आक्रमक

मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेने बेकऱ्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाने दिलेली मुदत संपल्यानंतरही ८७ परवानाधारक बेकऱ्यांमध्ये लाकूड आणि कोळशाचा वापर सुरू असल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 21, 2026 | 11:45 AM
मुंबईतील ८७ बेकऱ्यांवर कारवाईचा बडगा? लाकूड-कोळशाचा वापर बंद करण्यासाठी पालिका आक्रमक

मुंबईतील ८७ बेकऱ्यांवर कारवाईचा बडगा? लाकूड-कोळशाचा वापर बंद करण्यासाठी पालिका आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • मुंबईतील ८७ बेकऱ्यांमध्ये अद्याप लाकूड आणि कोळशाचा वापर सुरू आहे.
  • बेकऱ्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाचा मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
  • स्वच्छ इंधनाचा वापर न करणाऱ्या बेकऱ्यांवर महापालिका आणि अग्निशमन दल संयुक्तपणे कारवाई करू शकतात.
शहरातील वाढत्या हवेच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपल्यानंतरही मुंबईतील ८७ परवानाधारक बेकऱ्यांनी अद्याप लाकूड आणि कोळशाचा वापर पूर्णपणे बंद केलेला नाही. न्यायालयाने मुदतवाढीची मागणी फेटाळून लावल्याने आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेतला असून, स्वच्छ इंधनाकडे न वळणाऱ्या या ८७बेकऱ्यांसह अनधिकृतपणे लाकूड जाळणाऱ्या इतर बेकऱ्यांवरही थेट कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग आणि अग्निशमन दल संयुक्तपणे ही मोहीम राबवणार आहे. शहरात एकूण ५८३ परवानाधारक बेकऱ्यांची नोंद असून, त्यापैकी पाच बेकऱ्या कायमस्वरूपी बंद झाल्या आहेत.

Mumbai News: अस्वस्थतेचे छुपे कारण आर्द्रता; शहरात उकाडा कायम! आकाश निरभ्र असल्याने सूर्यकिरणांचा थेट परिणाम

उर्वरित आस्थापनांपैकी बहुसंख्य बेकऱ्यांनी सुधारणा केली असली तरी अद्याप ८७ बेकऱ्यांमध्ये पारंपरिक इंधनाचाच वापर सुरू आहे. या बेकऱ्यांचा मुंबईतील ‘पीएम १०’ प्रदूषणात सुमारे ३.५ टक्के वाटा असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ‘बॉम्बे एन्व्हायर्नमेंट अॅक्शन ग्रुप’च्या अभ्यासानुसार अनेक बेकऱ्यांमध्ये जुन्या फर्निचरमधील रंगवलेले व प्रक्रिया केलेले टाकाऊ लाकूड जाळले जाते. या धुरामुळे हवेत घातक अस्थिर सेंद्रिय संयुगे मिसळतात, ज्यामुळे मुंबईकरांमध्ये श्वसनविकारांचा धोका वाढण्यासह धुरके व घातक ओझोनची पातळी वाढण्यास हातभार लागत आहे.

मार्गदर्शनानंतरही नियम बसवले धाब्यावर

जानेवारी २०२५ मधील जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने बेकऱ्याऱ्यांना एलपीजी, पीएनजी किंवा वीज यांसारख्या स्वच्छ इंधनाचा वापर सुरू करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली होती. यानंतर पालिकेने संबंधितांना नोटिसा बजावण्यासोबतच ‘पीएमएफएमई” योजनेतून आर्थिक साह्य मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन शिबिरेही घेतली, मात्र तरीही ८७ बेकऱ्यांनी नियम धाब्यावर बसवले आहेत.

ड्रिंक अँड ड्राइव्हची कारवाई टाळण्यासाठी ५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप; व्हिडिओ व्हायरल होताच ए एस आय निलंबित

दरवाढीमुळे कंबरडे मोडल्याची व्यथा व्यक्त

  • स्वच्छ इंधन स्वीकारलेल्या व्यावसायिकांनी मात्र दरवाढीमुळे कंबरडे मोडल्याची व्यथा मांडली आहे.
  • भायखळ्यातील बेकरीचालक मिर्झा गयासुद्दीन बेग यांच्या म्हणण्यानुसार, स्वच्छ इंधनावर आधारित यंत्रणा उभारण्यासाठी २० लाखांपर्यंत भांडवली खर्च करावा लागला असून, एलपीजीच्या दरांमुळे मासिक इंधन खर्च तिप्पट झाला आहे.
  • त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करत असतानाच व्यवसायाचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रशासनाने स्वच्छ इंधनावर अनुदान द्यावे, अशी मागणी बैंकरीचालक करत आहेत.
  • एकीकडे वाढत्या खर्चाचे आव्हान आणि दुसरीकडे पालिकेचा संभाव्य बहगा, अशा कात्रीत आता हे बेकरी व्यावसायिक अडकले आहेत.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.
💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबईतील किती बेकऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे?

    Ans: लाकूड आणि कोळशाचा वापर सुरू ठेवणाऱ्या ८७ परवानाधारक बेकऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

  • Que: बेकऱ्यांना कोणत्या स्वच्छ इंधनाचा वापर करावा लागणार आहे?

    Ans: बेकऱ्यांना एलपीजी, पीएनजी किंवा विजेसारख्या स्वच्छ इंधनाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.

  • Que: बेकऱ्यांवर कारवाई का केली जाणार आहे?

    Ans: शहरातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी आणि न्यायालयाच्या निर्देशांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी ही कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Mumbai 87 bakeries bmc action wood coal use air pollution clean fuel rules nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Mumbai News
  • muncipal corporation
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Mumbai News: अस्वस्थतेचे छुपे कारण आर्द्रता; शहरात उकाडा कायम! आकाश निरभ्र असल्याने सूर्यकिरणांचा थेट परिणाम
1

Mumbai News: अस्वस्थतेचे छुपे कारण आर्द्रता; शहरात उकाडा कायम! आकाश निरभ्र असल्याने सूर्यकिरणांचा थेट परिणाम

Mumbai News: मुंबईत ऑर्थोपेडिक सेवांचा विस्तार; निवम ऑर्थोपेडिक्सची सूर्या हॉस्पिटल्ससोबत भागीदारी
2

Mumbai News: मुंबईत ऑर्थोपेडिक सेवांचा विस्तार; निवम ऑर्थोपेडिक्सची सूर्या हॉस्पिटल्ससोबत भागीदारी

Chandrapur News: चंद्रपुरात पावसाची मोठी तूट; रब्बी पिकांचे नियोजन कसे कराल? कृषी विभागाने सांगितला पर्याय
3

Chandrapur News: चंद्रपुरात पावसाची मोठी तूट; रब्बी पिकांचे नियोजन कसे कराल? कृषी विभागाने सांगितला पर्याय

Raigad News: रायगडच्या विकासासाठी ५९४ कोटींचा निधी; मार्चअखेर १०० टक्के खर्चाचे पालकमंत्र्यांचे निर्देश
4

Raigad News: रायगडच्या विकासासाठी ५९४ कोटींचा निधी; मार्चअखेर १०० टक्के खर्चाचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.