मुंबईच्या भिवंडी येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. भिवंडी शहरातील प्रसिद्ध शाळेत फी नाही भरली म्हणून एका विद्यार्थ्याला जमिनीवर बसवण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहे. ही घटना सलाहुद्दीन आयुबी मेमोरियल इंग्लिश अँड उर्दू स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे घडली आहे. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वेळीच सावध व्हा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
हे शिक्षणाचे मंदिर आहे की अपमान करण्याचे ठिकाण?
शाळेत फी न भरल्याने दहावीच्या विध्यार्थ्याला जमिनीवर बसण्यास भाग पडल्याने नागरिकांमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या अपमानास्पद आणि अमानुष वर्तनामुळे मुलाला नैराश्याचा सामना करावा लागला आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी शाळा व्यवस्थापनाच्या या अमानुष वृत्तीचा तीव्र निषेध केला आहे. ‘फी न भरणे म्हणजे मुलाचा अपमान करणे आहे का? हे शिक्षणाचे मंदिर आहे की अपमान करण्याचे ठिकाण?’ असे प्रश्न लोक उपस्थित करत आहेत.
या प्रकरणी कुटुंबीयांनी थेट शांती नगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि शाळा प्रशासनाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. शुल्काच्या नावाखाली निष्पाप मुलांच्या प्रतिष्ठेशी तडजोड करणाऱ्या अशा शाळांविरुद्ध कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात कोणतीही शैक्षणिक संस्था असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
असंवेदनशीलता समोर
घटना समोर आल्यांनतर शाळा प्रशासनाचे आणि मुख्याध्यापकांचे मत जाणून घेण्यासाठी जेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना प्रथम तासन्तास वाट पाहावी लागली. त्यानंतर मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाचे फोन बंद केले. या वृत्तीमुळे शाळा व्यवस्थापनाची असंवेदनशीलता आणखी उघड झाली आहे.
जुन्या वादातून नव्या वादाला तोंड फुटलं! तुर्भेत मध्यरात्री इसमावर हल्ला
एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतील तुर्भे परिसरात जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणी सात ओळखीच्या आणि तीन अनोळखी इसमांविरुद्ध तुर्भे एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या प्रकरणातील चार आरोपींना अटक केली आहे, तर उर्वरित फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
फर्यादी आशुतोष मोहन धुर्वे (वय 31) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 8 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सुमारे 12.30 वाजता ही घटना घडली. आरोपी विकी पाटील, संकेत लाड, ओंकार वाघमारे, विकी पाटीलची पत्नी चारुशिला, विद्वेष घरत, शकील, मौला आणि अन्य तीन अनोळखी इसम यांनी एकत्र येऊन तक्रारदार व त्याच्या मित्रांवर हल्ला केला.
Pune Police : चोरट्यांवर पोलिसांचेच पांघरुन; खोटं बोलून ‘लायटर’ दाखवणाऱ्या पोलिसांचे पितळ पडले उघडे