Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: ठाणे पोलिसांची मोठी कामगिरी! दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

वय वर्षे 34 असलेला हा आरोपी डोंबिवली पूर्व निळजेगाव येथील हनुमान मंदिर येथे राहण्यास आहे, याला ताब्यात घेतल्या नंतर त्याच्या वर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 07, 2025 | 07:44 PM
Thane News: ठाणे पोलिसांची मोठी कामगिरी! दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Thane News: ठाणे पोलिसांची मोठी कामगिरी! दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे: बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा घरफोडी करणाऱ्या रोशन जाधव या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेने मोठ्या शिताफिने अटक केली आहे आणि त्याच्याकडून 19 लाख 81 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे,अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंग जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

ठाणे बदलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी चोरीच्या गुन्हा दाखल होता.  त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 4 हे करत होते, त्या अनुषंगाने पोलीस हवालदार गणेश गावडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली.  या घरफोडी प्रकरणातील संशयित आरोपी बाळा जाधव हा उल्हासनगर येथील अमरडाय ह्या बंद असलेल्या कंपनी जवळ फिरतआहे, त्या प्रमाणे पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, पोलीस हवालदार गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, योगेश वाघ, चंद्रकांत सावंत, रितेश वंजारी, मंगेश जाधव आणि इतर कर्मचारी यांनी मिळून साफळा रचून रोशन जाधव याला अटक केली.

वय वर्षे 34 असलेला हा आरोपी डोंबिवली पूर्व निळजेगाव येथील हनुमान मंदिर येथे राहण्यास आहे, याला ताब्यात घेतल्या नंतर त्याच्या वर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून घरफोडी गुन्ह्यामधील सोन्या, चांदीचे दागिने, दोन लॅपटॉप, दोन मोबाईल, तसेच रोख रक्कम असे एकुण 19,81,360 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला व त्याने केलेले आठ गुन्हे उघडकीस आणले.  माननीय न्यायालयाने त्याला आज पर्यंत पोलीस कस्टडी दिली होती ती आज वाढवून देण्याची शक्यता आहे.

वडगावमध्ये भरदिवसा घरफोडी

वडगाव बुद्रुक परिसरात चोरट्यांनी भरदिवसा बंद फ्लॅट फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ११ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दीपाली प्रसाद गुरव (वय ३४, रा. सद्गुरुकृपा बिल्डींग, रेणुकानगरी, वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनुसार, चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime : वडगावमध्ये भरदिवसा घरफोडी; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज चोरला

पोलिसांच्या माहितीनुसार, गुरव यांचे वडील आजारी आहेत. त्यांना डेक्कन जिमखाना भागातील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. सोमवारी (२३ जून) सकाळी साडेदहाच्या सुमारास त्या फ्लॅट बंद करुन रुग्णालयात गेल्या होत्या. रुग्णालयातून त्या सायंकाळी सहाच्या सुमारास घरी आल्या. तेव्हा फ्लॅटचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले. चोरट्यानी कपाट उचकटून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ११ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचे उघडकीस आले. त्यानंतर गुरव यांनी रात्री पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.

Web Title: Thane police arrested burglary crime accused and seized 19 lakhs marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 07:44 PM

Topics:  

  • crime news
  • Thane Crime
  • Thane news

संबंधित बातम्या

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक
1

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
2

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
3

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
4

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.