
चंद्रपूर किडनी प्रकरणातील मोठी अपडेट; आरोपीला सोलापुरातून केली अटक
चंद्रपूर : शेतनागभीड तालुक्यातील सावकारी कर्जाची परतफेड करण्यासाठी किडनी विकल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. हे प्रकरण समोर येताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात सहा सावकारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. चंद्रपूर पोलिसांना हवा असलेल्या एका आरोपीला सोलापुरातून अटक करण्यात आली.
कृष्णा उर्फ मल्लेश असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली. या अटकेनंतर त्याला न्यायालयात नेले असताना न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सावकरी कर्जची परतफेड करण्यासाठी किडनी विक्रीच्या खळबळजनक प्रकरणात चंद्रपूर पोलिसांना मोठे यश आले आहे. राज्यभरात सर्वत्र लक्ष वेधून घेणाऱ्या किडनी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत या आरोपीसह सहा जणांना अटक केली आहे. पूर्वी अटक केलेल्या पाच आरोपींनाही सोमवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने मागील पाच आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हेदेखील वाचा : चंद्रपुरातील किडनी प्रकरण समोर येताच पोलिसांकडून मोठी कारवाई; सहा जणांवर गुन्हा दाखल करून…
नागभीड तहसीलमधील मिंथूर गावातील रहिवासी रोशन कुडे यांना कर्ज फेडण्यासाठी बेकायदेशीर सावकारांनी त्यांची किडनी विकण्यास भाग पाडले होते. त्यानंतर ते परदेशात कंबोडियाला गेले आणि तेथील रुग्णालयात विक्रीसाठी त्यांची किडनी काढून टाकली. रोशनने दिलेल्या माहितीनुसार, रोशन नावाच्या एका शेतकऱ्याने पोलिसांना सांगितले की, कोलकाता येथील रहिवासी कृष्णाने त्यांना या किडनी विक्रीत सल्ला दिला होता आणि मदत केली होती.
संभाव्य टोळीचा पोलिसांकडून तपास
रोशनच्या माहितीनंतर पोलिसांनी या प्रकरणात अवयव तस्करीच्या संभाव्य टोळीचा तपास सुरू केला. पोलिस या प्रकरणातील आरोपी कृष्णाचा शोध घेत होते. अखेर त्याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
एक लाखाचे कर्ज पोहोचले 74 लाखांवर…
शेतकऱ्यांना अनेक प्रश्न भेडसावत असतात. शेतीसाठी बँका अथवा खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले जाते. मात्र, त्याची परतफेड करता आली नाहीतर अनेक अडचणी येतात. अशीच परिस्थिती असल्याने शेतकऱ्याने चक्क स्वत:ची किडनी विकल्याचा धक्कादायक प्रकार नागभीड तालुक्यातील मिंथूर येथे घडला. एक लाखाचे कर्ज 74 लाखांवर पोहोचले असून, किडनी विकूनही कर्जाची परतफेड मात्र झाली नसल्याचेही उघडकीस आले आहे.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! सावकारी तगाद्यापायी शेतकऱ्याने विकली किडनी; एक लाखाचे कर्ज गेले 74 लाखांवर