Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरदिवसा चोरीचा थरार ! अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली; दुचाकीवरून आले अन्…

एका ब्राह्मणाकडे जात असताना शनिमंदिरासमोर हा प्रकार घडला. अचानक मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी क्षणात महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून भरधाव वेगाने पळ काढला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 09, 2026 | 03:06 PM
भरदिवसा चोरीचा थरार ! अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली; दुचाकीवरून आले अन्...

भरदिवसा चोरीचा थरार ! अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली; दुचाकीवरून आले अन्...

Follow Us
Follow Us:

नाशिक : लासलगाव (वा.) येथील शनिमंदिर परिसरात भरदिवसा अडीच तोळ्याची सोन्याची पोत चोरीची धक्कादायक घटना घडली. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी (दि.७) दुपारी सुमारे ४.३५ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढली. त्यानंतर या चोरट्यांनी घटनास्थळावरून पोबारा केल्याची घटना घडली असून, ती परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

संबंधित महिला लग्नपत्रिका पाहण्यासाठी लासलगाव येथील एका ब्राह्मणाकडे जात असताना शनिमंदिरासमोर हा प्रकार घडला. अचानक मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी क्षणात महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून भरधाव वेगाने पळ काढला. दरम्यान, अशा गजबजलेल्या परिसरात भरदिवसा झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे पोलिस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. लासलगाव पोलिसांनी लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास संबंधित महिला व तिच्या कुटुंबाला देत, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

हेदेखील वाचा : Bihar Crime: सकाळी ग्रामस्थांना जाणवला दुर्गंध…पाहताच विहिरीत दिसला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह; हत्या की आत्महत्या?

दरम्यान, या घटनेनंतर संबंधित महिलेला मोठा धक्का बसला असून, काही वेळ त्या घाबरलेल्या अवस्थेत चोराच्या मागे आरडाओरड करत धावली. मात्र, चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ लासलगाव पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांकडून CCTV तपासणी

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उशिरा रात्रीपर्यंत लासलगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, शनिमंदिर परिसरात नेहमीच मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते.

डॉक्टर असल्याचे भासवून चुकीचे इंजेक्शन दिले अन्…

दुसऱ्या एका घटनेत, नवी मुंबई येथून एक धक्कादायक आणि वैधकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका वॉर्डबॉयने डॉक्टर असल्याचे भासवून एका २१ वर्षीय तरुणीला चुकीच्या इंजेक्शन देण्यात आला. या इंजेकशनमुळे त्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रचिती भिकुराम भुवड (वय 21) असे त्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी संदेश पाष्टे (वय 30) याला अटक केली आहे.

Web Title: Thieves stole a gold chain weighing two and a half tolas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • crime news
  • Nashik News
  • Theft Case

संबंधित बातम्या

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी
1

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक
2

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य
3

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
4

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.