Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: मानवतेला काळिमा! कचरा टाकण्याच्या वादातून गर्भवतीच्या पोटात लाथ; महिलेचा गर्भपात, परिसरात संताप

कचरा टाकण्याच्या वादातून एका गर्भवती महिलेच्या पोटात लाथ मारल्याने तिचा गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी महिलेसह तिघांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला असून पोलीस पुढील तपास करत आहेत

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 09, 2026 | 04:56 PM
मानवतेला काळिमा! कचरा टाकण्याच्या वादातून गर्भवतीच्या पोटात लाथ (Photo Credit - X)

मानवतेला काळिमा! कचरा टाकण्याच्या वादातून गर्भवतीच्या पोटात लाथ (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

 

  • पोटात लाथ मारल्याने महिलेचा गर्भपात!
  • कचरा टाकण्याच्या वादातून संतापजनक कृत्य
  • आरोपी फरार, न्यायालयाने फटकारले
छत्रपती संभाजीनगरमध्ये कचरा टाकण्याच्या किरकोळ वादातून एका गर्भवती महिलेच्या पोटात लाथ मारून तिचा गर्भपात घडवून आणल्याची धक्कादायक घटना बायजीपुरा परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी घरमालकीण, तिचा मुलगा आणि सून यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी फेटाळून लावला आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या कृत्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकी घटना काय?

फिर्यादी करिश्मा नदीम खान (२६) या आपल्या पती आणि चार मुलांसह कुरेशी पॅलेस परिसरात भाड्याने राहतात. घरमालकीण शाहेदा बेगम खान या त्यांच्या घरातील बेकरीचा कचरा वारंवार करिश्मा यांच्या खोलीसमोर टाकत होत्या. यावरून त्यांच्यात आधीपासूनच वाद सुरू होते. १५ जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पुन्हा कचरा टाकल्याने करिश्मा यांनी जाब विचारला असता, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

Madhyapradesh Crime: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकरण! 16 हजारांची लाच घेऊन अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याचा आरोप

लाथ मारली अन्…

वादादरम्यान घरमालकीण शाहेदा बेगम, तिचा मुलगा मोसीन खान आणि सून राणी खान यांनी करिश्मा यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी शाहेदा बेगम हिने गर्भवती असलेल्या करिश्मा यांच्या पोटात जोरात लाथ मारली. या हल्ल्यामुळे करिश्मा खाली कोसळल्या आणि गंभीर जखमी झाल्या. वैद्यकीय तपासणीत या भीषण आघातामुळे त्यांचा गर्भपात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरोपी फरार, न्यायालयाने फटकारले

घटनेनंतर जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपी पसार झाले. अटकेच्या भीतीने त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, सहाय्यक लोकअभियोक्ता राजू पहाडीया यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, “गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असून आरोपींनी एका निरागस जिवाचा जीव घेतला आहे. आरोपी अद्याप फरार असून त्यांचा जामीन फेटाळण्यात यावा.” न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत तिघांचाही जामीन नामंजूर केला.

आरोपींची नावे:

१. शाहेदा बेगम अनिस खान (४५) २. मोसीन खान अनिस खान (२८) ३. राणी खान मोसीन खान (२२)

भरदिवसा चोरीचा थरार ! अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली; दुचाकीवरून आले अन्…

Web Title: A pregnant woman kicked in the stomach over a dispute about throwing garbage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक
1

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
2

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला
3

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला

Maharashtra Today’s Live News in Marathi: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद
4

Maharashtra Today’s Live News in Marathi: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.