Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे शहरातील ‘दादागिरी’ मोडीत! ‘एमपीडीए’ अंतर्गत 293 गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई

पुणे पोलिसांनी कडक भूमिका घेत या गुन्हेगारीला मोडीत काढण्यासाठी एमपीडीए आणि मोक्काची ठोस आणि कठोर कारवाई करून गुंडाना धडा शिकवला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 09, 2026 | 12:52 PM
दारूच्या वादातून तिघांनी केली मित्राची हत्या; डोक्यावर काठीने बेदम मारलं अन् नंतर...

दारूच्या वादातून तिघांनी केली मित्राची हत्या; डोक्यावर काठीने बेदम मारलं अन् नंतर...

Follow Us
Follow Us:
  • पुणे शहरातील ‘दादागिरी’ मोडीत!
  • 293 गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई
  • धारदार हत्यारांचा वाढता वापर
पुणे : शांतताप्रिय पुण्याची लक्तरे गेल्या काही वर्षात गुन्हेगारीने वेशीला टांगली असताना पुणे पोलिसांनी कडक भूमिका घेत या गुन्हेगारीला मोडीत काढण्यासाठी एमपीडीए आणि मोक्काची ठोस आणि कठोर कारवाई करून गुंडाना धडा शिकवला आहे. झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एमपीडीए) २९३ जणांना स्थानबद्ध केले, तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) संशयितांवर अधिक कारवाई करून ३७० गुन्हेगारांना कारागृहात पाठवले आहे.

 

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी १ फेब्रुवारी २०२४ रोजी पुणे पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. नुकताच दोन वर्षांचा कालावधी पुर्ण होऊन आठ दिवस पुर्ण केली. या दोन वर्षांच्या कार्यकाळात गंभीर गुन्ह्यांसोबतच टोळी युद्धाचा देखील भडका उडाल्याचे दिसून आले. पण, या गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याचे काम सुरू केले. त्यांचे आर्थिक स्त्रोत शोधून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रथमच कारवाई केली. बेकायदा उभारलेले घरे, दुकाने त्यासोबतच जबरदस्तीने बळकावलेले घरे आणि इतर गोष्टी मोडीत काढत पायबंद घालण्यास सुरूवात केली.

हे सुद्धा वाचा : “बोलली नाहीस तर मारून टाकीन” एकतर्फी प्रेमातून कोयत्याने प्राणघातक हल्ला; नृत्यांगना गंभीर जखमी

धारदार हत्यारांचा वाढता वापर

पुणे शहरातील रस्त्यावरील वाद, टोळीयुद्ध आणि वर्चस्वाच्या संघर्षांत सन २०२४ मध्ये धारदार हत्यारांचा वापर झालेल्या गुन्ह्यांत वाढ झाल्याचे चित्र आहे. ही बाब पोलिसांसमोर नवे आव्हान ठरत असून, गेल्या दोन वर्षांत ‘कोयता गॅंग हा शब्द सर्वसाधारण वापरात आला आहे. तो शहरातील हिंसक गुन्हेगारीचे प्रतीक बनत आहे.

संघटित गुन्हेगारी, खंडणी टोळ्या, सट्टा-जुगार नेटवर्क व हिंसक टोळ्यांवर ‘मोक्का’ अंतर्गत प्रभावी कारवाई करण्यात आली आहे. यामुळे अनेक गुन्हेगारी टोळ्यांचे नेटवर्क ‘हिट’ झाले असून, त्यांच्या कारवायांना आळा बसला आहे. – अमितेशकुमार, पोलीस आयुक्त

पिंपरी-चिंचवड पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर

पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. पोलिस उपायुक्तांच्या चारही परिमंडळांतर्गत जानेवारी २०२६ या महिन्यात एकूण ४७ सराईत गुन्हेगारांवर तडीपार/हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर दोन सराइत गुन्हेगारांना ‘एमपीडीए’ कायद्यान्वये एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, खंडणीसाठी अपहरण, गंभीर दुखापत, महिलांवरील अत्याचार, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे तसेच तडीपार आदेशाचा भंग अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारांविरोधात ही व्यापक प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Pune police has taken major action against criminals in pune city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

धक्कादायक ! मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी धमकावून डांबलं अन् नंतर…
1

धक्कादायक ! मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी धमकावून डांबलं अन् नंतर…

डोक्याला विग अन् पुणे शहरात घरफोड्या; पोलिसांनी गुजरातच्या आरोपीसह चौघांना पकडले
2

डोक्याला विग अन् पुणे शहरात घरफोड्या; पोलिसांनी गुजरातच्या आरोपीसह चौघांना पकडले

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
3

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!
4

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.