Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh crime: रुग्णवाहिकेचा गेट उघडला आणि मृतदेह रस्त्यावर फेकला, नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका रुग्णवाहिकेतून मृतदेह स्ट्रेचरसहीत रस्त्यावर फेकला.नेमकं काय प्रक्ररण आहे? चला जाणून घेऊया.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 07, 2025 | 09:44 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका रुग्णवाहिकेतून मृतदेह स्ट्रेचरसहीत रस्त्यावर फेकला. दरम्यान यावेळी एका २४ वर्षीय मुलाच्या मृत्यूच्या घटनेनंतर ग्रामस्थ आणि कुटुंबांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. ग्रामीण लखनौ-गोंडा मार्गावर आंदोलन करत होते. यादरम्यान कोणीतरी रुग्णवाहिकेतून मृतदेह स्ट्रेचरसहीत खाली टाकला. मृत व्यक्तीच नाव हृदय लाल असं आहे. ही घटना गोंडा देहात कोतवाली भागातील बालपूर जाट गावात घडली.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी सांगितल्यानुसार, १ ऑगस्टला पैश्यांवरून वाद झाला होता आणि या वादाचं रूपांतर मारहाणीत झालं. त्यात ह्रदय लाल हा गंभीर जखमी झाला. त्याचा रुग्णालयात उपचार सुरु होता मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. मंगळवारी त्याने रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. तरूणाच्या मृत्यूची बातमी गावात पसरली आणि संतापाची लाट उसळली.

कुटुंबीय आणि ग्रामस्थ हे आक्रमक झाले. ते लखनौ गोंडा मार्गावर उतरले. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान एक रुग्णवाहिका मृतदेह घेऊन जात होती. या रुग्णवाहिकेच्या गेटवर एक व्यक्ती लटकला होता. त्याने हृदय लालचं मृतदेह स्ट्रेचरसह रस्त्यावर टाकला आणि रुग्णवाहिकेने तेथून पळ काढला. मृतदेह रस्त्यावर पडलेला पाहून कुटुंबीय आणि ग्रामस्थ स्तब्ध झाले. महिलांना मृतदेहाजवळ धाव घेत आणि हंबरडा फोडला. पोलिसांनी कशीबशी परिस्थिती नियंत्रणात आणत मृतदेह एका ट्रकमधून अंत्यसंस्कारासाठी पाठवला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. तसेच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली.

पोलिसांनी काय सांगितले…

या मारहाणीत चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणाचा तपास केला जात आहे. दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. मृतदेह रुग्णवाहिकेतून पडल्याचा तपास केला असता प्रथमदर्शनी अशी माहिती मिळाली की, कुटुंबियांनी तो मृतदेह रुग्णवाहिकेतून खाली उतरवला होता. कुटुंबियांनी काही जणांची माथी भडकवली होती. त्यांचा हेतू शव रस्त्यावर ठेवून आंदोलन करण्याचा होता. असे सीओ सीटीने सांगितले.

#गोंडा हमारे उत्तर प्रदेश के स्वास्थ्य विभाग को देखिये, एम्बुलेंस ड्राइवर शव को बीच रास्ते में छोड़कर भाग गया? pic.twitter.com/hV9CYujGlh — Abhimanyu Singh Journalist (@Abhimanyu1305) August 4, 2025

Web Title: The ambulance gate was opened and the body was thrown onto the road what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 09:43 AM

Topics:  

  • crime
  • Uttar Praadesh Crime
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Nagpur Crime: आई-बाप की हैवान! 12 वर्षांच्या मुलाला साखळीने बांधलं, 2 महिन्यांपासून चिमुकल्या जिवाचे हाल
1

Nagpur Crime: आई-बाप की हैवान! 12 वर्षांच्या मुलाला साखळीने बांधलं, 2 महिन्यांपासून चिमुकल्या जिवाचे हाल

Mumbai Crime: कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..
2

Mumbai Crime: कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..

Solapur Crime: डोळ्यात चटणी टाकली, चाकूने…; अमित ठाकरेंचा राईट हँड बाळासाहेब सरवदेंची हत्या; भाजपच्या आमदारावर गंभीर आरोप
3

Solapur Crime: डोळ्यात चटणी टाकली, चाकूने…; अमित ठाकरेंचा राईट हँड बाळासाहेब सरवदेंची हत्या; भाजपच्या आमदारावर गंभीर आरोप

Akola Crime : ‘रक्षकच भक्षक?’ महामार्गावर तरुणीचा पाठलाग; अश्लील बोलणे व हातवारे, पोलीस अधिकारी अटक
4

Akola Crime : ‘रक्षकच भक्षक?’ महामार्गावर तरुणीचा पाठलाग; अश्लील बोलणे व हातवारे, पोलीस अधिकारी अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.