Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंदेकर टोळीकडून वनराजच्या खुनातील आरोपींचे नातेवाईक टार्गेट; पोलीस यंत्रणेपुढे मोठे आव्हान

वनराज आंदेकर खूनानंतर वर्षपुर्तीच्यावेळीच आंदेकर टोळीकडून बदल्याच्या भावनेतून यातील सर्व आरोपींच्या नातेवाईकांना टार्गेट करण्यात आल्याचे समोर आलेले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 23, 2026 | 12:30 AM
आंदेकर टोळीकडून वनराजच्या खुनातील आरोपींचे नातेवाईक टार्गेट; पोलीस यंत्रणेपुढे मोठे आव्हान

आंदेकर टोळीकडून वनराजच्या खुनातील आरोपींचे नातेवाईक टार्गेट; पोलीस यंत्रणेपुढे मोठे आव्हान

Follow Us
Follow Us:

पुणे : वनराज आंदेकर खूनानंतर वर्षपुर्तीच्यावेळीच आंदेकर टोळीकडून बदल्याच्या भावनेतून यातील सर्व आरोपींच्या नातेवाईकांना टार्गेट करण्यात आल्याचे समोर आलेले असताना या खूनांचे नियोजनही ‘त्या’ वर्षातच झाल्याचे वास्तव आता समोर येऊ लागले आहे. कारण, आयुष कोमकरच्या खूनापुर्वीच आंदेकर टोळीचा सदस्य आवेज खान हा पुणे पोलिसांच्या रडारवरून लपण्यासाठी उत्तरप्रदेशात जाऊन लपल्याचे समोर आले आहे. अक्षय म्हस्केच्या खूनासाठी तो तीन दिवसांपुर्वीच पुण्यात आला होता, असेही समोर आले आहे.

 

माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा १ सप्टेंबर २०२४ रोजी सोमनाथ गायकवाड याच्या टोळीकडून खून झाला. या खूनाने शहर तर हादरले होतेच पण आंदेकर टोळी पुर्ण हादरून गेली होती. पण, आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरला हा खून जिव्हारी लागला होता. तेव्हाच आंदेकर टोळीकडून मुलाच्या बदल्यात आरोपींचे नातेवाईक टार्गेट करण्यात आले असल्याचे सांगितले जात होते.

पहिला खून सोमनाथ गायकवाड याच्या कुटूंबाचा होता, पण तो प्लॅन पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. नंतर मात्र, ऐन गणेशोत्सवाच्या काळात बंडू आंदेकरच्या मुलीचा मुलगा आयुष कोमकरचा तब्बल ९ गोळ्या झाडून खून केला. नंतर दुसरा खून वनराजच्या खूनातील आरोपी समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याचा खडी मशीन चौकात गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून करण्यात आला. त्यानंतर आता तिसऱ्या खूनाचा प्रयत्न झाला. सतत होणाऱ्या या घटनामुळे मात्र, पुण्यात मोठ्या दहशतीचे वातावरण पसरलेले आहे.

आयुष कोमकर खूनप्रकरणानंतर पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी उत्तर प्रदेशात लपून बसलेला आवेज खान अलीकडेच पुण्यात परतला. नंतर लगेचच त्याने तीन दिवस रेखी करून वनराज खून प्रकरणातील आरोपीचा भाऊ अक्षय म्हस्केवर गोळीबार व कोयत्याने हल्ला केला. त्यामुळे तो पोलिसांच्या रडारवरून लपण्यासाठीच उत्तरप्रदेशात गेला असल्याचेही आता निष्पन्न झाले आहे.

आयुष कोमकरच्या खुनानंतर पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीशी संबंधित सक्रिय गुन्हेगार व त्यांच्या साथीदारांविरोधात मोठी मोहीम राबवली. त्यावेळी सुमारे ५० जणांना ताब्यात घेतले होते. पोलिसांची धरपकड सुरू असताना आवेज खान हा पोलिसांच्या नजरेआड राहण्यासाठी उत्तर प्रदेशात गेल्याचे आता समोर आले आहे. आवेज खान हा कृष्णा आंदेकरसोबत कोंढवा येथील मोक्का गुन्ह्यात सहआरोपी असल्याची माहिती समोर आली आहे.

आंदेकर टोळीने सूड उगवण्यासाठी टप्प्याटप्प्याने हल्ल्यांचे नियोजन केल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात सुरू आहे. वनराज आंदेकर यांच्या खूनानंतर प्रथम आयुष कोमकर, नंतर गणेश काळे आणि आता अक्षय म्हस्के याच्यावर झालेला जीवघेणा हल्ला, या सर्व घटनांमुळे बदल्याचे सत्र नियोजनबद्ध पद्धतीने राबवले जात असल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदेकर टोळीशी संबंधित हालचालींवर लक्ष केंद्रीत केले आहे.

हे सुद्धा वाचा : अशोक खरात प्रकरणानंतर कारवाईला वेग; राज्यात दोन महिन्यांत तब्बल 35 भोंदू महाराजांविरोधात गुन्हे दाखल

पोलिसांचे फेल्युअर

आयुष कोमकरच्या खूनानंतर पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीच्या सर्वांची झडती घेतली. आंदेकर टोळीचे सदस्य, रेकॉर्डवर असलेले आरोपी इतकेच नव्हे तर अंधारातून मदत करणारे, काम करणारे व सोबत असलेल्यांना ताब्यात घेतले. सर्वांची माहिती गोळा केली. इतके असतानाही पोलिसांकडून आवेज खान हा नजरेतून सुटला गेल्याचेच आता सिद्ध होत आहे.

वनराजच्या खुनातील आरोपी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचे नियोजन आंदेकर टोळीने केले आहे, अशी माहिती पुणे पोलिस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. मात्र, माहिती असतानाही पोलिसांना हल्ले थांबवता येत नाहीत, असे चित्र आहे.

Web Title: The andekar gang has become active to avenge the murder of vanraj andekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Police Action
  • Vanraj Andekar

संबंधित बातम्या

Pune Crime : फरार गुंडाच्या बेकायदा हॉटेलवर चालवला बुलढोझर; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई
1

Pune Crime : फरार गुंडाच्या बेकायदा हॉटेलवर चालवला बुलढोझर; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

संगमनेर हादरलं! मुरुम वाहतुकीच्या वादातून गोळीबार; भाजप पदाधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न
2

संगमनेर हादरलं! मुरुम वाहतुकीच्या वादातून गोळीबार; भाजप पदाधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न

नवऱ्याने मोबाईल पाहिला, पत्नी संतापली… ओढणीने गळा आवळून केली हत्या; ७ महिन्यांपूर्वीच झालं होत लग्न
3

नवऱ्याने मोबाईल पाहिला, पत्नी संतापली… ओढणीने गळा आवळून केली हत्या; ७ महिन्यांपूर्वीच झालं होत लग्न

काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांची करडी नजर; तीन दिवसांत तब्बल 2202 वाहनांवर कारवाई
4

काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांची करडी नजर; तीन दिवसांत तब्बल 2202 वाहनांवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.