Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवऱ्याने मोबाईल पाहिला, पत्नी संतापली… ओढणीने गळा आवळून केली हत्या; ७ महिन्यांपूर्वीच झालं होत लग्न

Murder Case : दिल्लीतील जगतपुरी परिसरातून हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांचा संशय आल्याने पतीने तिचा मोबाईल तपासला. यानंतर झालेल्या वादात संतापलेल्या पत्नीने ओढणीने गळा आवळून पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर ती घटनास्थळावरून फरार झाली होती. पोलिसांनी गुरुद्वारातून पत्नीला अटक केली आहे

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 03, 2026 | 02:11 PM
नवऱ्याने मोबाईल पाहिला, पत्नी संतापली... ओढणीने गळा आवळून केली हत्या; ७ महिन्यांपूर्वीच झालं होत लग्न

नवऱ्याने मोबाईल पाहिला, पत्नी संतापली... ओढणीने गळा आवळून केली हत्या; ७ महिन्यांपूर्वीच झालं होत लग्न

Follow Us
Follow Us:
  • लग्नाला अवघे सात महिने झाले असताना एका नवविवाहित जोडप्याशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली.
  • मोबाईलवरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच गंभीर वळणावर पोहोचल्याचा आरोप.
  • पोलिसांनी आरोपीला अटक केली असून हत्येप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरण चर्चेत असतानाच दिल्लीतून हत्याकांडाचे नवे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. लग्नाच्या अवघ्या ७ महिन्यांनंतरच पत्नी जीवावर उठला आणि तिने गळा आवळत पतीची निघृण हत्या केली. मुख्य म्हणजे या हत्येमागचे कारण फार धक्क्दायक आणि हादरवणारे आहे. पोलिसांनी घटनेची दखल घेत गुन्हा दाखल केला असून आरोपी पत्नीला अटक करण्यात आली आहे. नक्की प्रकरण काय ते सविस्तर जाणून घेऊया.

बिग बाॅस फेम तान्या मित्तलच्या अडचणींमध्ये वाढ, सोशल मिडिया इन्फ्लुएंसरने लावले गंभीर आरोप

हत्येचे कारण काय?

माहीतीनुसार, सदर घटना ही दिल्लीतील शाहदरा जिल्ह्यातील जगतपुरी परिसरातून समोर येत आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने तिचा मोबाईन फोन चेक केला. यावरुन दोघांमध्ये मोठे भांडण झाले आणि त्याच रात्री पत्नीने ओढणीच्या मदतीने गळा दाबून पतीची हत्या केली. मृताची ओळख मुस्तकीम उर्फ साहिल अशी पटली आहे. घटनेनंतर पोलिसांचे एक पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी पत्नी अलीशाला (20) अटक केली. पतीच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं असून हत्येसाठी वापरण्यात आलेल्या ओढणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरु आहे.

आरोपीने गुन्हा कबूल केला

शाहदरा जिल्ह्यातील पोलिसांनी सांगितले की, २ जुलै रोजी साधारण ३.५२ च्या सुमारास जगतपुरी पोलिसांना दिल्लीतील रशीद मार्केटमध्ये एका महिलेने आपल्या पतीचा गळा दाबून खून केल्याचा पीसीआर कॉल आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले, जिथे त्यांना मुस्तकीम उर्फ साहिल (19) मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी तत्काळ साहिलला रुग्णालयात दाखल केले जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

मृतकाच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारीवर २ जुलै रोजी खुनाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरु केला. अलीशा घटनास्थळावरुन फरार झाली होती. अशात तपासादरम्यान गुरुद्वारात छापा टाकल्यानंतर तिथून अलीशाला ताब्यात घेण्यात आलं. सखोल चाैकशीनंतर, अखेर पोलिसांसमोर अलीशाने आपला गुन्हा कबूल केला.

आरोपीने सांगितले की, पतीला तिच्या विवाहबाह्य संबंधांविषयी संशय आला होता, ज्यामुळे त्याने रात्री तिचा मोबाईल फोन ताब्यात घेऊन त्यात पुरावा शोधण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीवरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. अलीशाने सांगितले की, भांडणावेळी पतीने तिला मारहाण देखील केली ज्यामुळे रागात येऊन तिने ओढणीने गळा दाबून पतीची हत्या केली. काही वेळीने मृताची आई जेव्हा तिथे पोहचली तेव्हा ती घटनास्थळावरुन फरार झाली आणि गुरुद्वारात जाऊन लपली.

‘मानसशास्त्रीय’ पद्धतीने केतनच्या खुनाचा उलगडा, पासपोर्ट अन् हुडीने दाखवली दिशा; पोलिसी खाक्याचा वापर नाही

मागच्या वर्षी झालं होत लग्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्तकीम एक डिलीव्हरी बाॅय असून गेल्या वर्षी १३ डिसेंबर रोजी त्याचे आणि अलीशाचे लग्न पार पडले होते. सांगितलं जात आहे की, लग्नापासून दोघांमध्ये वाद सुरु होते. या भांडणांमुळेच अलीशा सासरी नाही तर माहेरी अधिक काळ घालवायची. यामुळेच मुस्तकीमला आपल्या पत्नीवर शंका येऊ लागली होती. गेल्या सोमवारीच अलीशा माहेरातून सासरी परतली होती. गुरुवारी पती-पत्नीमध्ये पुन्हा भांडण झाले आणि यातच मुस्तकीमने अलीशाला मारहाण करायला सुरुवात केली. या गोष्टीवरुन अलीशाला राग अनावर झाला आणि तिने ओढणीने गळा दाबतच पतीची हत्या केली.

Web Title: Wife kills husband after phone check delhi jagatpuri murder case marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • crime news
  • delhi
  • Murder Case

संबंधित बातम्या

Crime News : Are You Ready to Die?’ चकीच्या मुखवट्यातून दहशत; फिलाडेल्फिया पोलिसांकडून शोधमोहीम
1

Crime News : Are You Ready to Die?’ चकीच्या मुखवट्यातून दहशत; फिलाडेल्फिया पोलिसांकडून शोधमोहीम

धक्कादायक ! डोके जमिनीवर आपटून पत्नीची हत्या; जेवण तयार नसल्याने संतापला पती अन् नंतर…
2

धक्कादायक ! डोके जमिनीवर आपटून पत्नीची हत्या; जेवण तयार नसल्याने संतापला पती अन् नंतर…

नाशिक हादरलं ! नवीन प्रियकराच्या मदतीने पार्टनरचा काढला काटा; मृतदेह कसारा घाटात नेला अन्…
3

नाशिक हादरलं ! नवीन प्रियकराच्या मदतीने पार्टनरचा काढला काटा; मृतदेह कसारा घाटात नेला अन्…

Latur Crime : कोयत्यासह तरुण पोलिसांच्या ताब्यात; शिवाजी चौक पोलीस ठाणे परिसरात मोठी कारवाई
4

Latur Crime : कोयत्यासह तरुण पोलिसांच्या ताब्यात; शिवाजी चौक पोलीस ठाणे परिसरात मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.