Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुध खरेदीप्रमाणे पुण्यात गांजा खरेदीसाठी लाईन! एएनटीएफची मोठी कारवाई; 40 जणांना पकडले

पुण्यातून ड्रग्ज हद्दपार करण्यासाठी पोलिस जंगजंग पछाडत असताना दुसरीकडे दुध खरेदीच्या लाईनप्रमाणे गांजाची लाईन लावून विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार अंमली पदार्थ विरोधी टाक्स फोर्सने उघडकीस आणला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 20, 2026 | 03:24 PM
दुध खरेदीप्रमाणे पुण्यात गांजा खरेदीसाठी लाईन! एएनटीएफची मोठी कारवाई; 40 जणांना पकडले

दुध खरेदीप्रमाणे पुण्यात गांजा खरेदीसाठी लाईन! एएनटीएफची मोठी कारवाई; 40 जणांना पकडले

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातून ड्रग्ज हद्दपार करण्यासाठी पोलिस जंगजंग पछाडत असताना दुसरीकडे दुध खरेदीच्या लाईनप्रमाणे गांजाची लाईन लावून विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार अंमली पदार्थ विरोधी टाक्स फोर्सने उघडकीस आणला आहे. या किरकोळ विक्रेत्याला पकडल्यानंतर त्याचा म्होरक्याला देखील पथकाने अटक करून तब्बल २ किलो गांजा जप्त केला आहे. विशेष म्हणजे, यांच्याकडून गांजा खरेदी करणारे अन् पिणाऱ्या ४० जणांना पकडून त्यांचे समुपदेशन देखील केले आहे. या कारवाईने पुण्यात मोठी खळबळ उडवली आहे.

अजु अहमद शेख (वय ३९, रा. कोंढवा) आणि गणेश सिद्धु पाटोळे (वय २९, रा. बुद्धविहार सोसायटी, कोंढवा) अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत. तर, त्यांचा आणखी एक साथीदार पसार असून, त्याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अंमली पदार्थ टास्क फोर्स महाराष्ट्राच्या पुणे पथकाचे प्रमुख ज्योतिप्रिया सिंह, पोलिस उपमहानिरीक्षक प्रविण पाटील, पोलिस उपायुक्त अनुज तारे, पोलिस उपअधीक्षक नंदिनी वग्यानी, उपनिरीक्षक आशिष सरवदे, पोलिस राहूल होळकर व त्यांच्या पथकाने केली आहे.

दोघेही अंमली पदार्थांची विक्री करणारे सराईत गुन्हेगार आहेत. गणेश पाटोळे हा अजु शेख याच्याकडे पगारावर कामाला आहे. त्यांच्यावर यापूर्वी एनडीपीएसचे २ गुन्हे दाखल आहेत. त्यात २०० ग्राम गांजा बाळगल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल आहे. एएनटीएफच्या (अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स) पथकाकडून ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाई सुरू आहे. नव्याने स्थापन झालेल्या या पथकाकडून राज्यभरात कारवाया सुरू आहेत. दरम्यान, पथकाला कोंढव्यात अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिस पथकाने माहिती घेतली असता त्यांना काकडे वस्तीतील शिवनेरी गल्लीतील दर्ग्याजवळ पाटोळा हा लाईन लावून एका पिशवीत गांजा विक्री करत असताना दिसून आला. त्यानूसार त्याला सापळा रचून पकडले. त्यानंतर त्याच्या माहितीवरून अजु शेख याला पकडण्यात आले.

लाईन लावून गांजाची विक्री

एनटीएफ पथकाने गांजाची माहिती काढत असताना एक व्हिडीओच शेअर केला आहे. त्यात पाटोळे हा भररस्त्यावर एका पिशवीत गांजाच्या पुढ्या ठेवून त्याची विक्री करत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, गांजा घेण्यासाठी त्याच्याकडे दुध खरेदीसाठी जशी लाईन लागते, तशाच पद्धतीने घोळका अन् नंबरने गांजा घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ड्रग्ज विक्रेत्यांना पोलिसांची भितीच नाही का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

हे सुद्धा वाचा : तिकीट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर हल्ला; हात-पाय बांधले, तोंडात रुमाल कोंबला अन्…

खरेदी करणारे ४० जणांना पकडले

पाटोळे तसेच अजु शेख याच्याकडून गांजा घेणाऱ्या अन् तो ओढणाऱ्या जवळपास ४० जणांना पोलिसांनी पकडले. त्यांना कोंढ‌वा पोलिस ठाण्यात नेहून त्यांचे समुपदेशन केले. याप्रकरणात पोलिसांनी १४ दुचाकी, तिनचाकी गाड्या, ३५ मोबाईल तसेच २६ हजार ९६० रुपयांची रोकड आणि ३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गणेश याच्याकडून एक किलो आणि शेख याच्याकडून एक किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. शेख हा मोठा विक्रेता असल्याची माहिती आहे.

Web Title: The antf has taken major action against those selling cannabis in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • crime news
  • Drugs
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
1

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
2

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
3

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…
4

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.