Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बावधन पोलिसांकडून वाहनचोरीच्या टोळीचा पर्दाफाश, तीन आरोपींसह विधिसंघर्षित बालक ताब्यात; तब्बल ‘इतक्या’ दुचाकी जप्त

मोटारसायकल आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा बावधन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींसह एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 04, 2026 | 11:46 AM
बावधन पोलिसांकडून वाहनचोरीच्या टोळीचा पर्दाफाश, तीन आरोपींसह विधिसंघर्षित बालक ताब्यात; तब्बल 'इतक्या' दुचाकी जप्त

बावधन पोलिसांकडून वाहनचोरीच्या टोळीचा पर्दाफाश, तीन आरोपींसह विधिसंघर्षित बालक ताब्यात; तब्बल 'इतक्या' दुचाकी जप्त

Follow Us
Follow Us:

पिंपरी : मोटारसायकल आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा बावधन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींसह एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून सुमारे ५ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या सात मोटारसायकली आणि २४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या तपासातून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटना घडत असल्याने आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे आणि तपास पथकाने आरोपींचा शोध सुरू केला होता. पोलीस पथक म्हाळुंगे-नांदे रस्त्यावर गस्त घालत असताना युनिकॉर्न मोटारसायकलवरून जाणारा एक तरुण पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. संबंधित मोटारसायकलला क्रमांकपाटी नव्हती. तसेच वाहनाच्या कागदपत्रांविषयी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी मोटारसायकलच्या इंजिन आणि चेसिस क्रमांकाची तपासणी केल्यानंतर ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधित तरुणाची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने हिंजवडी परिसरासह विविध ठिकाणांहून मोटारसायकली आणि मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमित लाड जाधव (वय २०), वसंत अंकुश जाधव (वय २५) आणि सुनील लहू जाधव (वय २५) यांच्यासह एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरीच्या सात मोटारसायकली आणि २४ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ५ लाख ३५ हजार रुपये आहे.

या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील चार, हिंजवडी पोलीस ठाण्यातील दोन आणि शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यातील एक अशा एकूण सात चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस त्यादृष्टीने पुढील तपास करीत आहेत. ही कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक परवेज शिकलगार, पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे आणि तपास पथकाने केली.

हे सुद्धा वाचा : पत्नीची हत्या करून मागितली मदत; मित्राने 112 वर काॅल करत पोलिसांसमोर उघड केला संपूर्ण हत्येचा कट

Web Title: The bavdhan police have busted a gang of vehicle thieves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Theft Case

संबंधित बातम्या

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम!  पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…
1

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम! पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…

शिरुर हादरलं ! पूर्ववैमनस्यातून तरूणावर गोळीबार; लोखंडी पाईपनेही बेदम मारहाण, अखेर मृत्यू
2

शिरुर हादरलं ! पूर्ववैमनस्यातून तरूणावर गोळीबार; लोखंडी पाईपनेही बेदम मारहाण, अखेर मृत्यू

लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा खून! तीक्ष्ण हत्याराने वार करुन संपवलं; नगरसेवकासह तिघे फरार
3

लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा खून! तीक्ष्ण हत्याराने वार करुन संपवलं; नगरसेवकासह तिघे फरार

Crime News : नात्याला डाग! लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर
4

Crime News : नात्याला डाग! लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.