Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Case: लग्नाच्या खरेदीसाठी 1 कोटी घेतले; सियाने एवढ्या पैश्यांचा काय केलं?

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही हत्या केवळ लग्नाला नकार दिल्यामुळे नव्हे तर आर्थिक फसवणूक आणि पूर्वनियोजित कटाचा भाग होती. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी 1 कोटींच्या व्यवहारानंतर हत्येचा प्लॅन रचल्याचा तपासात दावा आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 29, 2026 | 02:31 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सिया गोयलने लग्नाच्या तयारीच्या नावाखाली केतनकडून सुमारे 1 कोटी रुपये घेतल्याचा पोलिसांचा दावा.
  • हे पैसे प्रियकर चेतन चौधरीच्या व्यवसायासाठी वापरल्याची माहिती तपासात समोर आली.
  • लोहगडावर केतनला ढकलण्यासाठी दोघांनी कोड सिग्नलसह आधीच कट रचल्याचा पोलिसांचा दावा.
पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लग्नाच्या खरेदीसाठी सिया गोयलने केतनकडे लग्नाच्या पूर्वतयारीसाठी आणि खरेदीसाठी पैशांची मागणी केली होती. केतनने तिच्यावर विश्वास ठेवून सुमारे १ कोटी रुपयांची मोठी रक्कम सियाकडे सुपूर्द केली. मात्र तिने एवढ्या पैश्यांच काय केलं?

काय केलं सियाने १ कोटी रुपयांचं?

सियाने हे १ कोटी रुपयांत स्वतःच्या लग्नासाठी न वापरता, तिचा प्रियकर चेतन चौधरी याला दिले. चेतन चौधरी हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीचा होता. त्याने स्वतःचा व्यवसाय आणि करिअर स्थिर करण्यासाठी सियाकडे 3 वर्षांचा वेळ मागितला होता. त्यामुळे दोघांनी ठरवले होते की, केतनचा काटा काढल्यानंतर सिया संशय टाळण्यासाठी पुढील 3 वर्षे लग्न करणार नाही. एकदा का हे प्रकरण शांत झाले आणि चेतन आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला की, घरच्यांच्या संमतीने ते लग्न करणार होते.

Ketan Agrawal Murder Case: कॅफेत रचला कट, लोहगडावर पडताना पकडू नये म्हणून…; सिया-चेतनने आधीच केली हत्येची रिहर्सल?

सिया-चेतनने आधीच केली हत्येची रिहर्सल

हत्येच्या एक दिवस आधी सिया आणि चेतनने पुण्याच्या लुल्लानगरमधील एका कॅफेमध्ये बसून केतनचा काटा काढण्याची पूर्ण स्क्रिप्ट तयार केली होती. हत्या करण्याच्या पूर्वी दोघांनी लोहगड किल्ल्यावर येऊन हत्येसाठी योग्य जागेची निवड देखील केली होती. एवढेच नाही तर तिथे गुन्ह्याचा सराव म्हणजेच रिहर्सल देखील करण्यात आला होता. पोलीस आता त्या सराव केलेल्या जागेचा शोध घेत आहेत.

खाली पडतांना पकडू नये म्हणून…

१८ जूनला लोहगडावरून पोहोचल्यावर सियाने पाणी पिण्याच्या किंवा बुटाची लेस बांधण्याच्या बहाण्याने खाली बसून मागे चालणाऱ्या चेतन चौधरीला इशारा केला. पोलिसांच्या मते केतन दरीत कोसळत असतांना त्याने स्वतःला वाचवण्यासाठी सियाला पकडू नये म्हणून ती खाली बसली होती. सियाचा इशारा मिळताच चेतनने केतनला थेट ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले.

सियाच्या मैत्रिणीला चौकशीसाठी बोलावले

सिया गोयल हिच्या अत्यंत जवळच्या दोन मैत्रिणींसह रेणू मित्तल, नरेंद्र मित्तल आणि त्यांचा मुलगा यश मित्तल यांना लोणावळा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सिया आपल्या मैत्रिणीसोबत वैयक्तिक आयुष्य आणि गुप्त गोष्टी शेअर करत होती. त्यामुळे या मैत्रणीच्या चौकशीतून हत्येच्या कटाचे आणखी काही खुलासे होण्याची शक्यता पोलिसांना आहे.

Nasrapur Crime: ‘आता फासावर चढाव लागेल…’,न्यायाधीशांनी आरोपीला सुनावले, पुणे हादरवणाऱ्या नसरापूर प्रकरणात मोठा निकाल

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतन अग्रवालची हत्या का करण्यात आली?

    Ans: पोलिसांच्या तपासानुसार, आर्थिक फसवणूक आणि पूर्वनियोजित कटामुळे हत्या करण्यात आल्याचा दावा आहे.

  • Que: सिया गोयलने केतनकडून किती पैसे घेतले होते?

    Ans: लग्नाच्या तयारीच्या नावाखाली सुमारे 1 कोटी रुपये घेतल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • Que: हत्येचा प्लॅन कसा रचला होता?

    Ans: लोहगड किल्ल्यावर संकेत देऊन केतनला कड्यावरून ढकलण्याचा कट रचल्याचा पोलिसांचा दावा आहे.

Web Title: Ketan agarwal case 1 crore taken for wedding shopping how was such a large sum utilized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • crime
  • Ketan Agrawal Murder Case
  • Pune Crime

संबंधित बातम्या

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड
1

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?
2

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
3

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
4

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.