Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयुष कोमकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट! आंदेकर टोळीबाबत न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

अटकेत असलेल्या आंदेकर टोळीतील सदस्यांची सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा आदेश दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 30, 2025 | 01:46 PM
आयुष कोमकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट! आंदेकर टोळीबाबत न्यायालयाने दिला 'हा' निर्णय

आयुष कोमकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट! आंदेकर टोळीबाबत न्यायालयाने दिला 'हा' निर्णय

Follow Us
Follow Us:

पुणे : वर्षभरापूर्वी पुण्यात झालेल्या वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने आयुष कोमकरला संपवले. 5 सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या आदल्या रात्री आठ वाजता पुण्यातील नाना पेठ परिसरात दोन मारेकऱ्यांनी आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी काही दिवसाखाली आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. आता कोमकर हत्या प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. अटकेत असलेल्या आंदेकर टोळीतील सदस्यांची सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा आदेश दिला आहे.

आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत बंडू अण्णा आंदेकर (वय ७०), तुषार नीलंजय वाडेकर (वय २७), स्वराज नीलंजय वाडेकर (वय २३), अमन युसूफ पठाण (वय २५, सर्व रा. नाना पेठ), सुजल राहुल मेरगु (वय २०), यश सिद्धेश्वर पाटील (वय १९), अमित प्रकाश पाटोळे (वय १९), शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९), कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर(वय ३६), मुनाफ रिजाय पठाण (वय २८, रा. नाना पेठ) यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तर यापूर्वीच लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०, सर्व रा. नानापेठ) आणि वृंदावनी नीलंजय वाडेकर (वय ४०) यांना येरवडा कारागृहात पाठविण्यात आले आहे.

बंडू आंदेकर तसेच सोमनाथ गायकवाड यांच्या टोळी युद्धातून वनराज आंदेकर याचा गेल्या वर्षी गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून झाला होता. या खूनाचा बदला म्हणून गणेश कोमकरचा मुलगा आयुषचा गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गोळ्या झाडून खून करण्यात आला होता, असे पोलिस तपासातून पुढे आले आहे.

गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. तर आरोपी पोलिस कोठडीत असताना झालेल्या तपासाची माहिती तपास अधिकारी असलेले सहायक आयुक्त शंकर खटके यांनी दिली. आरोपींच्या वतीने ॲड. मिथुन चव्हाण, ॲड. मनोज माने, ॲड. प्रशांत पवार, ॲड. प्रतीक पवार आणि ॲड. अमित थोरात यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.

Web Title: The court has given a major decision regarding the andekar gang

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 01:46 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police Action
  • Vanraj Andekar

संबंधित बातम्या

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
1

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
2

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
3

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…
4

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.