Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

सख्ख्या बहिणीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आणि नंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भावाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 29, 2026 | 11:37 AM
रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

Follow Us
Follow Us:
  • रक्ताच्या नात्याला काळिमा!
  • भावानेच केला बहिणीचा खून
  • न्यायालयाने सुनावली शिक्षा
पुणे : सख्ख्या बहिणीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आणि नंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भावाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार शर्मा यांनी हा निकाल दिला आहे. किरकोळ वादातून अन् मानसिक तणावातून त्याने हे कृत्य केले होते. सुबोजीत साधन बासू (वय ४३, रा. अपराजिता सोसायटी, बावधन, मूळ रा. कोलकाता) असे दोषी ठरवण्यात आलेल्या भावाचे नाव आहे.

 

या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अशोक वंजारी यांनी याबाबत तक्रार दिली होती. ही घटना १४ एप्रिल २०१० ला पहाटे पाचच्या सुमारास बावधन येथील अपराजिता अपार्टमेंटमध्ये घडली होती. सुबोजीत याने कौटुंबिक व मानसिक तणावातून आपली धाकटी बहीण प्रियदर्शिनी बासू (वय २३) हिचा गळा आवळून खून केला. नंतर त्याने स्वतःच्या हाताची हाताची नस कापून आणि फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुबोजीतने खडकपूर आयआयटीती लमधील एका प्राध्यापकास ‘मी बहिणीला मारले आहे आणि आत्महत्या करत आहे,’ अशी माहिती दिली होती. प्राध्यापकाने तातडीने पुणे पोलिस नियंत्रण कक्षाला कळवले होते. माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता प्रियदर्शिनी मृत अवस्थेत आढळली, तर सुबोजीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याला तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक आर. टी. पवार यांनी केला. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी नऊ साक्षीदार तपासले.

हे सुद्धा वाचा : नागपुरात ढोंगी बाबाचा भयंकर पराक्रम! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गरोदर आढळल्याने खळबळ

मानसिक अस्वस्थतेचा बचाव फेटाळला

यामध्ये टेलिफोन कॉल डिटेल्स (सीडीआर), वैद्यकीय अहवाल आणि आरोपीने प्राध्यापकांकडे केलेली कबुली हे पुरावे महत्त्वाचे ठरले. खटल्याच्या न्यायालयीन कामकाजात हिंजवडी पोलिस ठाण्यातील पोलिस नितीन साळुंके, सायली फडतरे, आबा सावंत आणि नितीन पवार यांनी मदत केली. आरोपीने बचावासाठी आपण तीव्र नैराश्यात होता त्यामुळे मानसिक अस्वस्थतेचा लाभ मिळावा, असा युक्तिवाद केला होता. मात्र, ससून रुग्णालयाच्या मानसोपचार तज्ज्ञांची साक्ष ग्राह्य धरत न्यायालयाने स्पष्ट केले की, मानसिक ताणतणाव आणि वेडेपणा यात मोठा फरक आहे. घटनेच्या वेळी आणि उपचार सुरू असताना आरोपीला स्वतःच्या कृत्याची पूर्ण जाणीव होती. आरोपीने घटनेनंतर लगेच प्राध्यापकांना फोन करून माहिती देणे, पोलिसांत शरण येण्याची भाषा करणे आणि नंतर पश्चात्ताप व्यक्त करणे, यावरून त्याची वैचारिक क्षमता अबाधित होती हे सिद्ध होते, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

Web Title: The court has sentenced the brother for murdering his sister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून
1

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप
2

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

Baramati Crime: माळेगाव हादरले! गजबजलेल्या राजहंस चौकात दोन तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला
3

Baramati Crime: माळेगाव हादरले! गजबजलेल्या राजहंस चौकात दोन तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…
4

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.