Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेपत्ता विद्यार्थिनीचा विहिरीत सापडला मृतदेह; बारामती तालुक्यात खळबळ

शारदानगर (ता. बारामती) येथील २१ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह माळेगाव खुर्द–केव्हिके रस्त्यालगत असलेल्या विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 16, 2026 | 02:08 PM
बेपत्ता विद्यार्थिनीचा विहिरीत सापडला मृतदेह; बारामती तालुक्यात खळबळ

बेपत्ता विद्यार्थिनीचा विहिरीत सापडला मृतदेह; बारामती तालुक्यात खळबळ

Follow Us
Follow Us:
  • बेपत्ता विद्यार्थिनीचा विहिरीत सापडला मृतदेह
  • बारामती तालुक्यात खळबळ
  • पोलिसांकडून तपास सुरु
माळेगाव : शारदानगर (ता. बारामती) येथील २१ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह माळेगाव खुर्द–केव्हिके रस्त्यालगत असलेल्या विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतीक्षा दत्तात्रय मेमाणे (ह.मु. शारदानगर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून तिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा मेमाणे ही शिक्षण घेत असलेली तरुणी असून, ९ मार्च रोजी सकाळच्या सुमारास घरातून बाहेर पडली होती. मात्र दिवसभर उलटूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. ओळखीच्या ठिकाणी चौकशी तसेच मित्रमैत्रिणींशी संपर्क साधूनही तिचा काहीही थांगपत्ता लागला नाही. अखेर तिचे वडील दत्तात्रय नामदेव मेमाणे (रा. शारदानगर) यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.

दरम्यान, शनिवारी सकाळच्या सुमारास माळेगाव खुर्द–केव्हिके रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीत पाण्यावर तरंगणारा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो प्रतीक्षा मेमाणे हिचाच असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची पोलिसांनी प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. पुढील तपास हवालदार सय्यद करीत आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात धक्कादायक प्रकार! कॉलेज तरुणावर जीवघेणा हल्ला; तरुणाच्या डोक्यात कोयता अडकला आणि…

लोणीकंदमध्ये 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पती, सासू आणि दिर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहितेचे नाव वैष्णवी यशवंत लाटे (वय २२) असे आहे. या प्रकरणी तिची आई गंगाबाई अशोक जामकर (रा. वडगाव गुंदा, जि. बीड) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार ७ मे २०२५ पासून विवाहितेला सासरी वारंवार पैश्यांसाठी त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. पती यशवंत शिवनाथ लाटे हा मारहाण करून शिवीगाळ करत आईकडून पैसे आणण्याची मागणी करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच सासू सखुबाई शिवनाथ लाटे, सासरा शिवनाथ महादेव लाटे आणि दिर सुरज शिवनाथ लाटे यांनीही पैश्यांसाठी तगादा लावत तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे.

Web Title: The discovery of a girls body in a well has created a stir in the shardanagar area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • baramati
  • crime news
  • Death

संबंधित बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
1

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
2

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
3

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
4

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.