Pune Crime: सासरी पैशांसाठी छळ; लोणीकंदमध्ये 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा
काय घडलं नेमकं?
वाघोलीमध्ये कॉलेज तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. हल्ला झालेला तरुण नागेश जगताप हा आपल्या मित्रासह हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबला होता. यावेळी त्याठिकाणी आरोपी मंगेश सांगळे आणि पवन राठोड हे दोघे आले. तु मला शिवी का दिलीस? असं म्हणत आरोपींनी नागेशसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. नागेश वर कोयत्याने हल्ला करण्यात आला. त्यात कोयता त्याच्या डोक्यात अडकला.त्याच अवस्थेत इतर मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनीही शर्थीचे प्रयत्न करुन कोयता काढून तरुणाचे प्राण वाचवले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पोलीस तपास सुरु आहे.
दोन आरोपींना अटक
या प्रकरणी मंगेश सांगळे (वय २३, रा. शिवतेज पार्क, वाघोली), पवन राठोड (वय १८, रा. डोमखेल वस्ती, वाघोली) या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना वाघोलीतील रायसोनी कॉलेज गेट समोरील अखंड अमृततुल्य हॉटेल येथे १२ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सासरी पैशांसाठी छळ; लोणीकंदमध्ये 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा
पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पती, सासू आणि दिर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहितेचे नाव वैष्णवी यशवंत लाटे (वय २२) असे आहे.
Pune Accident: भरधाव डंपरची दुचाकीला धडक; आजोबा आणि 9 वर्षांच्या नातीचा मृत्यू
Ans: पुण्यातील वाघोली परिसरात रायसोनी कॉलेज गेटसमोरील अखंड अमृततुल्य हॉटेल येथे ही घटना घडली.
Ans: नागेश सुनिल जगताप हा महाविद्यालयीन तरुण या हल्ल्यात गंभीर जखमी झाला.
Ans: “तू मला शिवी का दिलीस?” या कारणावरून तरुणांमध्ये वाद झाला आणि त्यातून कोयत्याने हल्ला करण्यात आ






