फोटो-istockphoto
पुणे: कौटूंबिक कारणातून वादावादी झाल्यानंतर चिडलेल्या डॉक्टर पतीने पत्नीच्या हाताचा चावा घेऊन शिवीगाळ केली. तर, तिला गाडीवरून जोरात ढकलून देत जखमी केले. याबाबत पत्नीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, खराडी येथील २७ वर्षीय डॉक्टरवर खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घोरपडे पेठ परिसरात घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कौटुंबिक कारणातून तक्रारदार आणि डॉक्टर पती यांच्यात वाद आहेत. ८ नोव्हेंबर रोजी तक्रारदार पतीला भेटण्यास त्यांच्या घोरपडेपेठ येथील क्लिनिकमध्ये गेल्या होत्या. आपण दोघे एकत्र राहून संसार करून असे त्या पतीला म्हणाल्या. त्यावेळी आरोपी पती क्लिनिक बंद न करत तेथून निघाला. त्यावेळी तु मला एकटीला सोडून जावू नको असे म्हणून पतीच्या शार्टाला धरले, त्यामुळे राग आलेल्या पतीने त्यांच्या डाव्या हाताच्या दंडावर जोरात चावा घेतला. त्यात त्या जखमी झाल्या. पुढे दोघे गाडीवर बसून बोलत निघाले होते. त्यावेळी डॉक्टरने रागात पत्नीला शिवीगाळ करत गाडीवरून ढकलून दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पुण्याच्या हडपसरमध्ये बंद फ्लॅट फोडले
पुणे शहरात अनेक गुन्हेगरीचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासन गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. पुण्याच्या हडपसर भागात घरफोडीचा गुन्हा घडला आहे. हडपसर परिसरात चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून ५ लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अनंता पवार (वय ६२, रा. धारवाडकर कॉलनी, गोपाळपट्टी, मांजरी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पवार कुटुंबीय दिवाळीनिमित्त गावी गेले होते. चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडले. तसेच, बेडरूमध्ये घुसून कपाट उचकटून चोरट्यांनी ४ लाख ८७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. पवार कुटुंबीय सोमवारी गावाहून परतले. तेव्हा फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.
हेही वाचा: Crime News: पुण्याच्या हडपसरमध्ये बंद फ्लॅट फोडून तब्बल ‘इतके’ लाख लुटले; पोलिसांचा तपास सुरू
महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
हडपसरसोबतच सदाशिव पेठेतील सोसायटीत घरफोडीचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला सदाशिव पेठेतील सोसायटीत राहायला आहेत. ९ नोव्हेंबर रोजी त्या धनकवडीतील शंकर महाराज मठात दर्शनासाठी गेल्या होत्या. दुपारी त्या मंदिरातून घरी आल्या. तेव्हा फ्लॅटचे कुलूप तोडून चोरटे घरात शिरल्याचा प्रकार महिलेच्या लक्षात आला. महिलेने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महिलेला धक्का देऊन चोरटे पसार झाले. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही तपासासाठी ताब्यात घेतले असून, पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे तपास करत आहेत.