Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सणासुदीत भेसळीवर FDA ची करडी नजर! 6 आस्थापनांमधून तब्बल 675 किलो अन्नसाठा जप्त

सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, पेढे आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ होत असतानाच अन्न भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नांदेड जिल्ह्यात तपासणीची धडक मोहीम सुरू केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 26, 2026 | 01:44 PM
सणासुदीत भेसळीवर FDA ची करडी नजर!  6 आस्थापनांमधून तब्बल 675 किलो अन्नसाठा जप्त

सणासुदीत भेसळीवर FDA ची करडी नजर!  6 आस्थापनांमधून तब्बल 675 किलो अन्नसाठा जप्त

Follow Us
Follow Us:

नांदेड : सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, पेढे आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ होत असतानाच अन्न भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नांदेड जिल्ह्यात तपासणीची धडक मोहीम सुरू केली आहे. ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ अभियानांतर्गत झालेल्या कारवाईत सहा आस्थापनांमधून तब्बल ६७५ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत २ लाख ८९ हजार ८० रुपये आहे. विविध अन्नपदार्थांचे ५४ नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

 

अन्न व औषध प्रशासन, नांदेड कार्यालयामार्फत जिल्ह्यातील मिठाई दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्रे तसेच अन्य खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत सहा आस्थापनांमधून तूप, खवा, कुंदा पेढा, स्वीट पेढा, मावा पेढा आणि खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला.

जिल्ह्यातील २८ आस्थापनांची केली तपासणी

नांदेड जिल्ह्यातील स्वीट मार्ट, दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच अन्य खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या २८ आस्थापनांचीही तपासणी करण्यात आली आहे. यावेळी खवा, पनीर, पेढा, बर्फी, खाद्यतेल आदींचे २६ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

ग्राहकांनीही दक्ष राहण्याचे आवाहन

सणासुदीच्या काळात नागरिकांनी परवानाधारक विक्रेत्यांकडूनच अन्नपदार्थांची खरेदी करावी. पॅकबंद पदार्थ घेताना पॅकिंगवरील माहिती, वैधता कालावधी आणि आवश्यक तपशील तपासावेत. मिठाई व दुग्धजन्य पदार्थांची साठवणूक योग्य पद्धतीने झाली आहे का, याचीही ग्राहकांनी खात्री करावी. अन्न भेसळ किंवा असुरक्षित अन्नपदार्थांची विक्री आढळल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या नांदेड कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच FOSCOS ऑनलाइन पोर्टल अथवा complaints.ma-hafda.in वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहायक आयुक्तांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा : मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

कुठे किती साठा जप्त ?

मे. शिवकृपा दूध भांडार, देगलूर नाका, नांदेड येथून ८८ किलो तूप व ४९ किलो खवा, मे. श्रीसाई खवा सेंटर, मालेगाव रोड येथून ९९ किलो खवा, तर मे. खंडेलवाल मिठाई, एमआयडीसी येथून ९९ किलो खवा जप्त करण्यात आला आहे. मे. बदामराव पेढेवाले, पाळज, ता. भोकर येथून ३८ किलो कुंदा पेढा व ७८ किलो स्वीट पेढा, मे. काशीराम दाचावर, कुंडलवाडी, ता. बिलोली येथून १४६ लिटर रिफाइंड सोयाबीन तेल आणि मे. जगदंबा बिकानेर, वाई बाजार, ता. माहूर येथून ७८ किलो मावा पेढा जप्त करण्यात आला आहे.

Web Title: The fda has initiated vigorous action to curb food adulteration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • FDA Action
  • FDA Raid
  • nanded news
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
1

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर
2

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन
3

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार
4

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.