Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; डॉमिनोजच्या ६ आउटलेट्ससह ८ ठिकाणी FDA ची कारवाई

अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागातील आठ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 17, 2026 | 06:01 PM
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; डॉमिनोजच्या ६ आउटलेट्ससह ८ ठिकाणी FDA ची कारवाई

अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; डॉमिनोजच्या ६ आउटलेट्ससह ८ ठिकाणी FDA ची कारवाई

Follow Us
Follow Us:
  • FDA कडून ८ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित
  • डॉमिनोजच्या ६ आउटलेट्सवर कारवाई
  • पुणे, चाकण आणि कोल्हापुरातील आस्थापनांचा समावेश
पुणे : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागातील आठ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये डॉमिनोज पिझ्झाच्या सहा आउटलेट्सचा समावेश आहे. पुण्यातील वारजे, हिंगणे खुर्द, चाकण आणि केईएम रुग्णालयाजवळील, तसेच कोल्हापुरातील राजारामपुरी आणि संभाजीनगर येथील डॉमिनोजच्या आउटलेट्सवर ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, शिवाजीनगर येथील ‘स्पेशल तुपातील साबुदाणा वडे’ आणि वाघोलीतील ‘मे. यासीन फूड सेंटर’ या आस्थापनांचेही परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

 

एफडीएकडून गेल्या चार दिवसांत डॉमिनोज पिझ्झाच्या ५० हून अधिक आस्थापनांची विशेष तपासणी करण्यात आली. या तपासणीत काही ठिकाणी स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, मृत झुरळांचे अवशेष आणि अस्वच्छता आढळून आली. तसेच, अन्नपदार्थांची साठवणूक आणि हाताळणी करताना आवश्यक नियमांचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले. शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थ हाताळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचे योग्य विलगीकरण केलेले नव्हते. अन्नपदार्थ स्वीकारताना तापमानाच्या नोंदी अपूर्ण असल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले. याशिवाय, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाचा अभाव, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, भोजनकक्षातील स्वच्छतागृहातून येणारी दुर्गंधी आणि अन्नवितरण कर्मचाऱ्यांकडे विहित ओळखपत्रांचा अभाव, अशा त्रुटी आढळल्या.

हे सुद्धा वाचा : कोपरी पुलावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना! कारवर कोसळल्या लोखंडी सळ्या; MMRDA ने ठोठावला २ कोटींचा दंड

ग्राहकांच्या आरोग्याला प्राधान्य

अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि ग्राहकांचे आरोग्य लक्षात घेऊन खाद्य आस्थापनांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, नामांकित खाद्यसाखळ्या आणि ऑनलाइन अन्नवितरण करणाऱ्या आस्थापनांमधील स्वच्छता व अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन तपासले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे एफडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: FDA ने किती खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले?

    Ans: अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे विभागातील आठ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत.

  • Que: डॉमिनोजच्या किती आउटलेट्सवर कारवाई झाली?

    Ans: डॉमिनोजच्या सहा आउटलेट्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

  • Que: कोणत्या ठिकाणच्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली?

    Ans: पुण्यातील वारजे, हिंगणे खुर्द, चाकण, केईएम रुग्णालयाजवळील आउटलेट्स तसेच कोल्हापुरातील राजारामपुरी आणि संभाजीनगर येथील डॉमिनोज आउटलेट्सवर कारवाई झाली. शिवाजीनगरमधील साबुदाणा वडा विक्रेते आणि वाघोलीतील यासीन फूड सेंटरचाही समावेश आहे.

Web Title: The fda has taken major action in the pune division for violations of food safety regulations nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • FDA
  • FDA Action
  • pune news

संबंधित बातम्या

Pune MLC Election : सोलापुरात भाजपची जोरदार मोर्चेबांधणी! रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह
1

Pune MLC Election : सोलापुरात भाजपची जोरदार मोर्चेबांधणी! रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह

ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, येरवड्यातील दुर्घटनेने खळबळ; नागरिकांचा संताप
2

ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, येरवड्यातील दुर्घटनेने खळबळ; नागरिकांचा संताप

विद्यार्थी निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप नको; ऑनलाइनऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी
3

विद्यार्थी निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप नको; ऑनलाइनऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; डोंगराळ जिल्हे पेटले, 19 जणांचा मृत्यू
4

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; डोंगराळ जिल्हे पेटले, 19 जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.