Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थी निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप नको; ऑनलाइनऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी

विद्यार्थी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी, त्यात राजकीय हस्तक्षेप होऊ नये आणि ऑनलाइन मतदानाऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 18, 2026 | 04:25 PM
विद्यार्थी निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप नको; ऑनलाइनऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी

विद्यार्थी निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप नको; ऑनलाइनऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे : विद्यार्थी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी, त्यात राजकीय हस्तक्षेप होऊ नये आणि ऑनलाइन मतदानाऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटनांनी केली आहे. विद्यार्थी निवडणुकीसंदर्भात आयोजित बैठकीला नियुक्त १२ सदस्यांच्या समितीपैकी केवळ दोनच सदस्य उपस्थित होते. तसेच, बैठक घेण्यासाठी अत्यंत कमी वेळ दिल्याने अनेक विद्यार्थ्यांना आपले म्हणणे मांडता आले नाही, असा आक्षेप डॉ. राहुल ससाणे नोंदविला.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित व स्वायत्त महाविद्यालय/मान्यताप्राप्त परिसंस्था/विभागातील विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटना, प्राचार्य संघटना, शिक्षक संघटना यांचे पदाधिकारी/सदस्य आणि संबंधित इतर सर्व घटकांना शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी भू-शास्त्र विभाग सभागृह विद्यार्थी परिषद निवडणुकांसंदर्भात संवाद झाला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे समिती सदस्य, अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड, पुणे सदस्य, प्राचार्य डॉ. संजय खरात विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विद्यार्थी निवडणुकीत ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळाली पाहिजे. राजकीय पक्षांच्या संघटना तसेच शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांच्या संचालकांचा निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव असू नये. संस्थाचालकांनी आपल्या पसंतीचे प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी मतदानावर प्रभाव टाकण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक आहे, असे ससाणे यांनी सांगितले.

बैठकीच्या आयोजनावर आक्षेप

समितीची बैठक घेण्याबाबतचे परिपत्रक आदल्या दिवशी काढून दुसऱ्याच दिवशी बैठक आयोजित करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. परिणामी, नगर आणि नाशिक परिसरातील अनेक विद्यार्थी बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. काही संघटनांचे प्रतिनिधीच प्रामुख्याने उपस्थित असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले; मात्र बैठकीचे अधिकृत व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

बैठक पुन्हा घेण्याची मागणी

झालेल्या बैठकीत सर्व संबंधितांचे म्हणणे प्रभावीपणे मांडले गेले नसल्याने ही बैठक अपेक्षित उद्देश साध्य करू शकली नाही, असे ससाणे यांनी म्हटले. त्यामुळे योग्य पूर्वसूचना आणि प्रसिद्धी देऊन बैठक पुन्हा आयोजित करावी. नगर-नाशिकसह सर्व संबंधित विद्यार्थ्यांना बैठकीची माहिती द्यावी, समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी आणि संपूर्ण बैठकीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

“दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या विद्यार्थी संवाद बैठकीची पूर्वसूचना पुरेशा प्रमाणात न दिल्याने सर्व विद्यार्थी समूहांना सहभागी होता आले नाही. तसेच प्रश्न व सूचनांचे व्यवस्थित इतिवृत्त आणि रेकॉर्डिंग झाले नाही. विद्यार्थी निवडणुकांमध्ये एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक, महिला, दिव्यांग व LGBTQIA+ घटकांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळण्यासाठी उभे-आडवे आरक्षण आणि भौगोलिक प्रतिनिधित्व आवश्यक आहे. अन्यथा वंचित घटकांचे प्रतिनिधित्व मर्यादित राहून सामाजिक अन्याय कायम राहण्याची भीती आहे.” -अभिषेक शेलकर (अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती पुणे विद्यापीठ)

हे सुद्धा वाचा : राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांसह १४ जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

“विद्यार्थी निवडणुकांमध्ये गंभीर फौजदारी गुन्ह्यांशी संबंधित विद्यार्थ्यांच्या पात्रतेबाबत स्पष्ट नियम असावेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा लोकशाही प्रक्रियेतील सहभाग वाढवण्यासाठी व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे.” -निकिता मेचकर (एसएफआय प्रतिनिधी.)

हे सुद्धा वाचा : सिन्नरजवळ गोंदे-दातली मार्गावर भीषण अपघात; कथड्याला पीकअप धडकून चार मजूरांचा मृत्यू

“राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी निवडणुका घेण्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी समितीने जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू ) आणि दिल्ली विद्यापीठ (डीयू) येथील विद्यार्थी निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अभ्यास करावा. तेथील अनुभव आणि कार्यपद्धती समजून घेऊन स्थानिक परिस्थितीला अनुरूप निर्णय घ्यावेत.” – प्रतिक्षा नवले  (विद्यार्थिनी)
💡

Frequently Asked Questions

  • Que: विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी काय आहे?

    Ans: विद्यार्थी निवडणुकीत पारदर्शकता राहावी, राजकीय हस्तक्षेप होऊ नये आणि ऑनलाइन मतदानाऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

  • Que: विद्यार्थी निवडणुकीसंदर्भातील समितीच्या बैठकीला किती सदस्य उपस्थित होते?

    Ans: नियुक्त १२ सदस्यांच्या समितीपैकी केवळ दोन सदस्य बैठकीला उपस्थित होते.

  • Que: समितीच्या बैठकीवर विद्यार्थ्यांनी कोणते आक्षेप घेतले?

    Ans: बैठक आयोजित करण्यासाठी अत्यंत कमी वेळ देण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांना आपले म्हणणे मांडता आले नाही, असा आक्षेप डॉ. राहुल ससाणे यांनी नोंदविला.

Web Title: There is a demand to conduct voting via ballot paper in student elections nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • pune news
  • Pune University
  • Savitribai Phule Pune University

संबंधित बातम्या

ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, येरवड्यातील दुर्घटनेने खळबळ; नागरिकांचा संताप
1

ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, येरवड्यातील दुर्घटनेने खळबळ; नागरिकांचा संताप

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; डोंगराळ जिल्हे पेटले, 19 जणांचा मृत्यू
2

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; डोंगराळ जिल्हे पेटले, 19 जणांचा मृत्यू

सरकार भाजपचे आहे, त्यांनी…; ‘सीजेपी’च्या परदेशी निधीच्या आरोपांवरुन सुप्रिया सुळे आक्रमक
3

सरकार भाजपचे आहे, त्यांनी…; ‘सीजेपी’च्या परदेशी निधीच्या आरोपांवरुन सुप्रिया सुळे आक्रमक

Football: पुण्याच्या अकतसुकीचा फुटबॉलमध्ये डंका! टायब्रेकरमध्ये मुंबईच्या संघाला चारली धूळ
4

Football: पुण्याच्या अकतसुकीचा फुटबॉलमध्ये डंका! टायब्रेकरमध्ये मुंबईच्या संघाला चारली धूळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.