Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, येरवड्यातील दुर्घटनेने खळबळ; नागरिकांचा संताप

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्याच्या येरवडा परिसरात एका 55 वर्षीय व्यक्तीचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर कामाच्या ठिकाणी सुरक्षितता नसल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 18, 2026 | 04:45 PM
ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, येरवड्यातील दुर्घटनेने खळबळ; नागरिकांचा संताप

ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, येरवड्यातील दुर्घटनेने खळबळ; नागरिकांचा संताप

Follow Us
Follow Us:
  • येरवड्यात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू
  • रिक्षाचा धक्का लागल्याने खड्ड्यात पडल्याची माहिती
  • रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील येरवडा परिसरात महापालिकेच्या ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रदीप परदेशी असे मृत व्यक्तीचे नाव असून, १७ ऑक्टोबर रोजी येरवड्यातील मच्छी मार्केट परिसरात ही दुर्घटना घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा येथील मच्छी मार्केट परिसरात महापालिकेकडून ड्रेनेजच्या कामासाठी खड्डा खोदण्यात आला. या परिसरातून जात असताना रिक्षाचा धक्का लागल्याने प्रदीप परदेशी हे खड्ड्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

खड्ड्याभोवती सुरक्षेच्या उपाययोजना होत्या का?

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ड्रेनेजच्या कामासाठी खोदण्यात आलेला खड्डा सुमारे १० ते १५ फूट खोल होता. इतका खोल खड्डा असतानाही त्याच्या परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. खड्ड्याभोवती योग्य बॅरिकेडिंग किंवा इतर सुरक्षा व्यवस्था होती का, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हे सुद्धा वाचा : विद्यार्थी निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप नको; ऑनलाइनऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी

परिसरात यापूर्वीही अशा प्रकारचे अपघात घडल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी सुरक्षेचे नियम पाळले जातात का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे. या घटनेनंतर मृत प्रदीप परदेशी यांच्या नातेवाइकांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या दुर्घटनेला जबाबदार कोण, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. तपासातून दुर्घटनेची नेमकी कारणे आणि संभाव्य निष्काळजीपणाबाबत काय समोर येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यातील ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव काय?

    Ans: प्रदीप परदेशी (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. येरवड्यातील मच्छी मार्केट परिसरात ही दुर्घटना घडली.

  • Que: येरवड्यात ही दुर्घटना कशी घडली?

    Ans: महापालिकेच्या ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात रिक्षाचा धक्का लागल्याने प्रदीप परदेशी पडल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर दुखापतीनंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

  • Que: या दुर्घटनेनंतर नागरिकांनी कोणते प्रश्न उपस्थित केले?

    Ans: खड्ड्याभोवती सुरक्षेच्या योग्य उपाययोजना करण्यात आल्या होत्या का आणि दुर्घटनेला जबाबदार कोण, असे प्रश्न नागरिक व मृताच्या नातेवाइकांनी उपस्थित केले आहेत. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

Web Title: An incident has occurred in pune where a person died after falling into a drainage pit nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • Death
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

विद्यार्थी निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप नको; ऑनलाइनऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी
1

विद्यार्थी निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप नको; ऑनलाइनऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; डोंगराळ जिल्हे पेटले, 19 जणांचा मृत्यू
2

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; डोंगराळ जिल्हे पेटले, 19 जणांचा मृत्यू

सरकार भाजपचे आहे, त्यांनी…; ‘सीजेपी’च्या परदेशी निधीच्या आरोपांवरुन सुप्रिया सुळे आक्रमक
3

सरकार भाजपचे आहे, त्यांनी…; ‘सीजेपी’च्या परदेशी निधीच्या आरोपांवरुन सुप्रिया सुळे आक्रमक

Belraj Kalarickal: मनोरंजनविश्वावर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शक बेलराज कलारिकलचं निधन, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह
4

Belraj Kalarickal: मनोरंजनविश्वावर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शक बेलराज कलारिकलचं निधन, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.