Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वनविभागाची मोठी कारवाई; राखीव वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळ्यांचा केला पर्दाफाश

आंबोली-दोडामार्ग राखीव वनक्षेत्रात बेकायदेशीर शिकार करणाऱ्या आंतरजिल्हा टोळ्यांचा वनविभागाने पर्दाफाश केला असून, दोन वेगवेगळ्या कारवाईंमध्ये ८ आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 19, 2026 | 12:10 PM
वनविभागाची मोठी कारवाई; राखीव वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळ्यांचा केला पर्दाफाश

वनविभागाची मोठी कारवाई; राखीव वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळ्यांचा केला पर्दाफाश

Follow Us
Follow Us:

सावंतवाडी : आंबोली-दोडामार्ग राखीव वनक्षेत्रात बेकायदेशीर शिकार करणाऱ्या आंतरजिल्हा टोळ्यांचा वनविभागाने पर्दाफाश केला असून, दोन वेगवेगळ्या कारवाईंमध्ये ८ आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. पश्चिम घाटातील जैवविविधतेचे आगर असलेल्या या संवर्धन क्षेत्रातून आरोपींकडून गावठी ठासणीची बंदूक, काडतूस बंदूक, जिवंत व वापरलेली काडतुसे, तलवार, विजेऱ्या, एक आलिशान एमजी हेक्टर गाडी आणि शिकार केलेले दुर्मिळ वन्यजीव जप्त करण्यात आले आहेत.

 

​मासुरु येथील शासकीय जंगलात वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या परिशिष्ट-१ अन्वये सर्वोच्च संरक्षण प्राप्त असलेल्या साळिंदर या वन्यजीवाची शिकार करून घेऊन जात असताना वनविभागाने पहिली कारवाई केली. रात्रीच्या अंधारात विजेरीच्या प्रकाशात शिकारीसाठी फिरणाऱ्या विठू वाघू कोकरे (वय ४५, रा. चुरणीचीमुस चौकुळ, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याचा वनविभागाच्या पथकाने सुमारे दीड किलोमीटर पाठलाग करून त्याला जंगलात रंगेहात ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी ठासणीची बंदूक, बंदुकीने ठार केलेले मृत साळिंदर, हेड टॉर्च आणि दारूगोळा हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ आणि भारतीय वन अधिनियम १९२७ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​ही कारवाई ताजी असतानाच मौजे नेने वन कक्ष क्रमांक १८१ मधील शिरगांवकर पॉईंट येथे वनविभागाला दुसरी टोळी पकडण्यात यश आले. पहाटेच्या सुमारास जंगलात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या ३ व्यक्तींचा पाठलाग करून त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे १ नळी काडतूस बंदूक, ७ जिवंत काडतुसे, १० वापरलेली काडतुसे, तलवार आणि शिकार केलेले मृत गेळा/पिसोरी (माऊस डीयर) व १ कटीदर/फटकुरा (एशियन पाम सिव्हेट) हे वन्यजीव आढळून आले. त्याच वेळी या शिकाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी कोल्हापूर येथून आलेली आलिशान एमजी हेक्टर गाडी (क्रमांक MH09GF 0014) वनविभागाच्या पथकाला आढळून आली. पथकाने तत्परता दाखवत गाडीतील ४ व्यक्तींसह शिकार करणाऱ्या इतर आरोपींना वाहनासह घटनास्थळावरच अटक करून ताब्यात घेतले.

हे सुद्धा वाचा : NEET पुनर्परीक्षेआधीच आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या; 2 दिवसात 4 विद्यार्थ्यांनी संपवले जीवन

​सदर धडक कारवाई सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) वैभव सा. बोराटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे.

हे सुद्धा वाचा : इंदापूर तालुक्यात गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी सापळा रचून पकडले

Web Title: The forest department has busted gangs that hunt wild animals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
1

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
2

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
3

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
4

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.