Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात जावयानेच लावली सासऱ्याच्या घराला आग; कारण वाचून बसेल धक्का

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने चक्क सासऱ्याच्या घराला आग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 06, 2024 | 02:36 PM
पुण्यात जावयानेच लावली सासऱ्याच्या घराला आग; कारण वाचून बसेल धक्का

पुण्यात जावयानेच लावली सासऱ्याच्या घराला आग; कारण वाचून बसेल धक्का

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने चक्क सासऱ्याच्या घराला आग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आला आहे. याप्रकरणी कविता किसन फेंगसे (वय ४१, रा. काळुबाई कॉलनी, सुतारदारा, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी साहील हनुमंत हाळंदे (वय २५, रा. भूगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पुणे शहरातील सुतारदरा येथील काळुबाई कॉलनीमध्ये गुरुवारी मध्यरात्री घडला आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता फेंगसे यांना तीन मुली असून त्यातील दोघींचा विवाह झाला आहे. तेजल हिचा साहील हाळंदे याच्याशी विवाह झाला आहे. त्यांना एक मुलगा आहे. तेजल हिची सासु कविता हाळंदे यांचा तक्रारदार यांना फोन आला. साहील कोणत्यातरी मुलीसोबत फिरतो. त्यामुळे तेजल व साहील यांचे भांडण झाले आहे. तरी तेजल हिला दोन दिवसांसाठी माहेरी पाठविते, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार तेजल सात महिन्यांच्या बाळाला घेऊन २६ नोव्हेंबर रोजी माहेरी आली.

२८ नोव्हेंबर रोजी तेजल हिला साहीलचा फोन आला. तू माहेरी का गेलीस म्हणून तिच्याशी फोनवर भांडण केले. त्यावेळी तक्रारदार यांनी त्याला माझ्या मुलीसोबत नीट संसार करा, नाहीतर मुलगी सासरी पाठविणार नाही, असे म्हणाल्या. साहील ऐकत नसल्याने त्यांनी दुसर्‍या मुलीला हा प्रकार सांगितला. तिने साहीलला खूप समजाविण्याचा प्रयत्न केला. तरी तो ऐकत नव्हता. नंतर त्यांनी २९ नोव्हेबरला भरोसा सेल येथे साहील हाळंदे याची तक्रार केली.

हे सुद्धा वाचा : पुण्यात मोठा अपघात, भरधाव कारची 4 वाहनांना धडक; नागरिकांची कारवर दगडफेक

मुलगा आजारी असल्याने ४ डिसेबर रोजी रात्री उशिरा ते मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यावेळी रात्री ९ वाजता साहीलचा तेजल हिला फोन आला. त्यांनी हॉस्पिटलमध्ये असल्याचे सांगितले. तरी तो सतत कॉल करत होता. रात्री सव्वा दहा वाजता साहीलचा फोन आला व तो धमकावू लागला. “आताचे आता तू इथे ये, मी तुझ्या आईच्या घराजवळ आलो आहे. तू ५ मिनिटांत जर घरी नाही आलीस तर तुझ्या आईचे घर जाळून टाकेन तसेच तुला पण बघुन घेइन” अशी धमकी दिली. त्यामुळे त्या घाबरुन मैत्रिणीच्या घरी गेल्या. मध्यरात्री पाऊण वाजता त्यांना फोन आला. तुमच्या घरातून धुर येत आहे. त्या घरी आल्या. तेव्हा शेजारील लोक, पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या घराला लागलेली आग विझवत होते. काही वेळात संपूर्ण आग विझली. आगीत घरातील संसारोपयोगी वस्तु, कपाटे, कपडे, गाद्या, भांडी, टिव्ही व इतर सर्व घरातील वस्तु अर्धवट जळून खुप मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास।सहायक निरीक्षक संदीप पवार करीत आहेत.

Web Title: The husband has set the house on fire after his wife left home nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 02:35 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…
1

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा
2

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
3

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?
4

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.