Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bishnoi Gang : बिष्णोई टोळीची सुत्रे हलतात पुण्यातून! गोळीबार अन् दहशतीने व्यावसायिकांमध्ये भिती

लॉरेन्स बिश्नोई टोळीने महाराष्ट्रात देखील पाय रोवले आहेत. धक्कादायक म्हणजे, आता या टोळीकडून व्यापाऱ्यांना धमकावणे आणि त्यांच्याकडून खंडण्या उकळण्यासारखे गंभीर प्रकार सुरू झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 25, 2026 | 01:12 PM
बिष्णोई टोळीची सुत्रे हलतात पुण्यातून! गोळीबार अन् दहशतीने व्यावसायिकांमध्ये भिती

बिष्णोई टोळीची सुत्रे हलतात पुण्यातून! गोळीबार अन् दहशतीने व्यावसायिकांमध्ये भिती

Follow Us
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक :  पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून आणि त्यानंतर पंजाब, हरियाणा आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये दहशतीचे जाळे निर्माण करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने महाराष्ट्रात देखील पाय रोवले आहेत. धक्कादायक म्हणजे, आता या टोळीकडून व्यापाऱ्यांना धमकावणे आणि त्यांच्याकडून खंडण्या उकळण्यासारखे गंभीर प्रकार सुरू झाले आहेत. विशेषत: या टोळीने महाराष्ट्रात व्याप्ती वाढवली असली, तरी त्याची सूत्रे पुण्यातूनच हलविली जात असल्याचे सातत्याने समोर येऊ लागले आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेपुढे मोठे या टोळीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

 

९ व्यापाऱ्यांकडून ५ कोटी खंडणीची मागणी

फुरसूंगी भागातील भागीदारीत स्टील व्यावसाय करणाऱ्या ९ व्यावसायिकांना प्रत्येकी ५ कोटीनुसार ५० कोटींची खंडणीची मागणी केल्याप्रकरणी आरजू बिष्नोई याच्यासह काही जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अद्याप तरी कोणाला अटक करण्यात आलेली नाही. गोळीबारापेक्षा भयंकर प्रकार म्हणजे, या गुन्ह्यात आधी खंडणीची मागणी करण्यासाठी फोन त्यावरून दोघांना धमकी आणि नंतर काही तासांतच गोळीबार घडवून आणणे. नंतर सोशल मिडीयावर एक घंटे में चमत्कार दिखा दिया असा मॅसेज टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रकार मानला जात आहे. यामुळे व्यावसायिकांच्या मनात प्रचंड भिती निर्माण झाली आहे.

काही दिवसांपुर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये बिष्नोई टोळीच्या नावानेच फर्निचर व्यावसायिकाच्या दुकानासमोर गोळीबार करण्यात आला होता. त्यातील काहींना अटक होताच, पुण्यातील व्यावसायिक टार्गेट करण्यात आले. धक्कादायक म्हणजे, ज्या दुचाकीवरून गोळीबार करणारे आरोपी आले, ती दुचाकी त्यांनी काही अंतरावर सोडून दिली. पण, या दुचाकीचा चासीनंबरही खोडून टाकला असल्याचे समोर आले आहे.

पुण्यातील घटना

मुंबईत ऑक्टोबर २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या केली होती. या करणाचा तपास पुढे सरकत असताना आरोपींचे बिश्नोई टोळीशी असलेले संबंध उघड झाले. त्याआधी सलमान खान यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार झाला होता. हे संपत असताना पुनावळे येथे फर्निचर मॉलवर गोळीबार झाला. याची जबाबदारीही बिष्नोई टोळीने घेतली. नंतर एका चित्रपट वित्त पुरवठादाराकडे ५ कोटींची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास बाबा सिद्दीकींसारखी अवस्था करू अशी धमकी दिली होती. आता फुरसूंगीतील व्यावसायिकाच्या गोडाऊनवर गोळीबार करण्यात आला.

टोळीचे सूत्रे पुण्यातून?

बिष्नोई टोळीचा तसा महाराष्ट्र तसेच पुणे किंवा मुंबईशी संबंध नाही. पण, या सर्वांमध्ये जिल्ह्यातील शुभम लोणकर या एका तरुणामुळे बिष्नोई टोळीने पाय रोवण्यास सुरूवात केली असल्याचे पोलिस सांगतात. बाबा सिद्दीकी हत्ये प्रकरणात प्रमुख सूत्रधार म्हणून त्याचे नाव आहे.

गँगचे पुणे कनेक्शन

सिद्धू मुसेवाला हत्येच्या तपासात, पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधवला गुजरातमधून अटक केली होती. जाधवला लपवून ठेवणारे नवनाथ सूर्यवंशी आणि सिद्धेश उर्फ महाकाल कांबळे यांनाही अटक झाली. तिघेही बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावातील रहिवासी आहे, तर कांबळे नारायणगावचा आणि सूर्यवंशी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील आहे. २०२१ मध्ये, मंचर परिसरात पूर्वीच्या भांडणामुळे संतोष जाधवने ओंकार उर्फ राण्या बाणखेले याच्यावर गोळीबार करून त्याचा खून केला होता. त्यानंतर तो पळून गेला आणि बिष्णोई टोळीशी त्याचा संपर्क झाला. आमदार बाबा सिद्दीकी खून प्रकरणात पुण्यात या खूनापुर्वीच सोशल मिडीयावर धमकीचा मजकूर टाकल्याचे समोर आले होते.

हे सुद्धा वाचा : मला लग्न करायचं नाही सांगितलं होतं…, सिया गोयलच्या खुलाशाने लोहगड हत्याकांडात खळबळ

मोठे नेटवर्क कार्यरत!

महाराष्ट्रात मुख्यत: मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागात तरुणांना गँगमध्ये सहभागी करून मोठे नेटवर्क उभे केले आहे. किरकोळ कामांपासून रेकी, वाहनांची व्यवस्था, संपर्क साधणे अशा विविध स्वरूपाच्या कामांसाठी तरुणांचा वापर केला जात असल्याचा संशय आहे.

Web Title: The lawrence bishnoi gang is creating a climate of terror in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Lawrence Bishnoi
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
2

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
3

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती
4

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.