Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे हादरलं! रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; मी खून केला म्हणाला अन्…

भाच्‍याच्‍या विस्कटलेल्या संसाराच्या रागातून एकाने त्याच्‍या सासरच्या डोक्यात मोठा दगड घालून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. महंमदवाडी येथील लक्ष्मी पार्कजवळील फॉरेस्टच्या डोंगरावर ही घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 11, 2026 | 02:02 PM
पुणे हादरलं! रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; मी खून केला म्हणाला अन्...

पुणे हादरलं! रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; मी खून केला म्हणाला अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाच्‍याच्‍या विस्कटलेल्या संसाराच्या रागातून एकाने त्याच्‍या सासरच्या डोक्यात मोठा दगड घालून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. महंमदवाडी येथील लक्ष्मी पार्कजवळील फॉरेस्टच्या डोंगरावर रविवारी (दि. ९) रात्री १०:३० च्या सुमारास ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे, खून केल्यानंतर रक्ताने माखलेला आरोपी स्वतःहून चालत काळेपडळ पोलिस ठाण्यात हजर झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सैफन बाबूलाल सय्यद (वय ४३, रा. राजीव गांधी कॉलनी, तरवडे वस्ती, हडपसर, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलिस अंमलदार विजया जयदीप चव्हाण (वय ३७) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी हनुमंत उर्फ सागर सुग्रीव कांबळे (वय २५, रा. आशीर्वाद पार्क, महंमदवाडी, पुणे) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मयत सैफन सय्यद यांची मुलगी सना हिचा विवाह आरोपी हनुमंत कांबळे याचा भाचा लखन काळोखे याच्‍याशी विवाह झाला होता. मात्र, आरोपीच्या भाच्याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. पतीच्या निधनानंतर सना सासरी व्यवस्थित नांदत नव्हती. रविवारी सासरच्या मंडळींशी झालेल्या वादानंतर सना ही रागाच्या भरात जंगलाच्या दिशेने निघून गेली होती. मुलीचा शोध घेण्यासाठी तिचे वडील सैफन सय्यद आणि आरोपी हनुमंत कांबळे हे दोघेही महंमदवाडी येथील लक्ष्मी पार्कजवळील फॉरेस्टच्या डोंगराकडे गेले. तेथे सिमेंटच्या टाकीजवळ दोघांमध्ये सना सासरी राहत नसल्याच्या कारणावरून वाद पेटला. या वादाचे रूपांतर हिंसेत झाले अन् संतापलेल्या कांबळे याने तेथे पडलेला मोठा दगड सैफन यांच्या डोक्यात मारून त्यांना जागीच ठार केले.

हे सुद्धा वाचा : खड्ड्यांचे साम्राज्य अन् ट्रॅफिकचा फास, चाकणमधून 20 कंपन्या गाशा गुंडाळणार? हजारो जणांचे रोजगार धोक्यात

रक्ताने माखलेला आरोपी पोलीस ठाण्यात

घटनेनंतर रविवारी रात्री ११:३५ च्या सुमारास आरोपी कांबळे हा स्वतः रडत आणि आरडाओरडा करत काळेपडळ पोलीस ठाण्यात आला. त्याच्या गळ्याला दुखापत झाली होती अन् अंगावरील कपड्यांवर रक्ताचे डाग होते. कर्तव्यावर असलेल्या महिला अंमलदार विजया चव्हाण यांनी विचारपूस केली असता, त्याने “मी सैफन सय्यदचा खून केला आहे,” असे सांगितले. त्यानंतर रात्रपाळीवरील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेठे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता सैफन यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिरे करत आहेत.

Web Title: An incident involving the murder of a person has occurred in punes mohammadwadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.