Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Murder : वडापाव बेतला जीवावर, पुण्यात तरुणाचा खून; नेमकं काय घडलं?

पुण्याचा मध्यभाग असलेल्या गणेश पेठ परिसरात वडापाव खरेदीसाठी गेल्यानंतर पायाला धक्का लागल्यावरून वाद झाल्यानंतर तरूणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 11, 2026 | 12:03 PM
वडापाव बेतला जीवावर, पुण्यात तरुणाचा खून; नेमकं काय घडलं?

वडापाव बेतला जीवावर, पुण्यात तरुणाचा खून; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्याचा मध्यभाग असलेल्या गणेश पेठ परिसरात वडापाव खरेदीसाठी गेल्यानंतर पायाला धक्का लागल्यावरून वाद झाल्यानंतर तरूणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश पेठेतील डुल्या मारूती चौक परिसरात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे.

शिवम राजेश परदेशी (वय २८, रा. गणेश पेठ) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी वैभव किशोर साळुंखे (वय २४, रा. गणेश पेठ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शिवम आणि वैभव दे दोघे गणेश पेठ परिसरात राहण्यास आहेत. दोघांची तोंड ओळख आहे. वैभव हा एका बिल्डरकडे अकाउंटंट म्हणून नोकरीस आहे. दोघांचेही वडील रिक्षा चालक आहेत. रविवारी दुपारी गणेश पेठेतील एका वडापावच्या गाडीवर दोघांचा एकमेकाला पाय लागला. यातून दोघांमध्ये वाद झाले. त्यातून वादाचे पर्यवसन मारहाणीत झाले. वैभव याने गणेशच्या छातीत जोरात बुक्या मारल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर शिवम भांडणानंतर घरी जाऊन झोपला होता. रात्री उशीरापर्यंत तो उठत नाही हे लक्षात आल्यावर घरच्यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. शेवटी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा  : ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ अन् घरात वादाची ठिणगी शेवट झाला थरकाप उडवणारा, नेमकं काय घडलं?

अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शी समोर आले आहे. हा प्रकार फरसखाना पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता तसेच नागरिक व त्यांच्या वादाची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने भांडणे झाल्याचे सांगितले. पुढील तपास फरासखाना पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा  : मिरा-भाईंदर हादरलं! आक्षेपार्ह व्हिडीओचा धाक दाखवून १४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ६ जणांवर गुन्हा दाखल, दोघे गजाआड

Web Title: A shocking incident involving the murder of a young man has occurred in pune 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • Arrested News
  • Murder News
  • Pune Crime

संबंधित बातम्या

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी
2

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक
3

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
4

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.