Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case: ओश्नोजल’मधून गर्भपाताच्या गोळ्या! अशोक खरातच्या क्रूरतेचा नवा पुरावा समोर

शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरातची फरार पत्नी कल्पना खरात हिच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 03, 2026 | 12:23 PM
खरातचे आणखी ६ महिलांशी संबंध

खरातचे आणखी ६ महिलांशी संबंध

Follow Us
Follow Us:
  • अशोक खरातने एका महिलेला भुरळ घालून तिचे लैंगिक शोषण केले
  • महिला गर्भवती राहिल्यानंतर अज्ञान गोळ्या आणि जडीबुटी देऊन तिचा गर्भपात घडवून आणला
  • मृत्यूचे भय दाखवून मोक्याच्या जमिनी खरातने लाटल्या
  • खरातच्या पत्नाविरधिात लूकआऊट नोटीस जारी
 

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरातने एका महिलेला ‘तू अप्सरा आहेस’ असे सांगून धार्मिक भुरळ घातली आणि तिचे लैंगिक शोषण केले. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिली असता, खरातने तिला अज्ञात गोळ्या आणि जडीबुटीचे औषध देऊन तिचा गर्भपात घडवून आणला. हे औषध त्याने कुठून आणले आणि यामागे आणखी कोणाचा हात आहे, याचा तपास एसआयटी करत आहे.

महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचे अनेक पैलू उलगडू लागले आहेत. तपास अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी सुरक्षेच्या कारणास्तव खरातला न्यायालयात आणणे जोखमीचे असल्याचे अर्जाद्वारे कळवले होते. न्यायालयाने ही विनंती मान्य केल्याने कोर्ट रूममध्ये चार मोठे स्क्रीन बसवून सुनावणी पार पडली.

Ashok Kharat Case: रुपाली चाकणकरांच्या बहिणीचे ‘भोंदूबाबा’ कनेक्शन उघड!

पीडितांची संपत्ती हडपण्याचा डाव?

तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की, खरात हा पीडितेच्या नातेवाईकांकडे वारंवार आधार कार्ड आणि पैन कार्डची मागणी करत होता. याद्वारे तो संबंधितांची मालमत्ता स्वतःच्या नावावर हडपण्याच्या बेतात होता का? या दिशेने आता एसआयटीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा दावाही सरकारी पक्षाने केला.

८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

सुनावणीदरम्यान न्यायाधीश बी. एन. ईचपुरानी यांनी खरातला ‘तुला काही सांगायचे आहे का?’ असे विचारले, त्यावर त्याने ‘नाही’ असे उत्तर दिले. खरातच्या वकिलांनी कोठडीला विरोध करताना सांगितले की, ही घटना २०२२ मधील असून आरोपीने यापूर्वी १४ दिवस कोठडी भोगली आहे, त्यामुळे पुन्हा कोठडीची गरज नाही, मात्र, गुन्ह्याचे स्वरूप आणि खरातची गुन्हेगारी कार्यपद्धती पाहता, न्यायालयाने त्याला ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Ashok kharat News: खरातच्या काळ्या पैशात वाटेकरी असणारे ते ४५ बडे …

मृत्यूचे भय दाखवून मोक्याच्या जमिनी खरातने लाटल्या

अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली सर्वसामान्यांपासून धनिकांपर्यंत सर्वांनाच लुटणाऱ्या भोंदू खरातने केवळ लोकांची दिशाभूलच केली नाही, तर चक्क मृत्यूची भीती’ दाखवून मोक्याच्या जमिनी कवडीमोल भावात लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिन्नरच्या मिरगाव येथील एका कुटुंबाने १९९७ मध्ये १६ लाखांची शेतजमीन घेतली होती, शेजारीच जमीन घेणाऱ्या भोंदू खरातची या जमिनीवर नजर होती, त्याने ‘तुमची जमीन शापित असून ती न विकल्यास घरात अनर्थ होईल’, अशी अंधश्रद्धेवी भीती घातली. दरम्यान, कुटुंबातील एका तरुण मुलीचा मृत्यू झाला. या घटनेचा गैरफायदा घेत खरातने, ‘जमीन न विकल्यास घरातील आणखी दोघांचा मृत्यू अटक आहे’, अशी भीती दाखवत त्या कुटुंबाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्‌वस्त केले. यातून भयभीत झालेल्या या कुटुंबाकडून १६ लाखांना घेतलेली जमीन त्याने अवघ्या ४ लाखांत स्वतःच्या आणि पत्नी कल्पना खरातच्या नावावर करून घेतली.

खरातच्या पत्नाविरधिात लूकआऊट नोटीस जारी

शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरातची फरार पत्नी कल्पना खरात हिच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे, कल्पना खरात परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद

शिर्डी पोलिसांकडून कल्पना खरातविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आल्याने आता देशातील सर्वच विमानतळावरुन संबंधित व्यक्तीला विदेशी प्रवासाची बंदी घालण्यात आली आहे. शिर्डीत भोंदू अशोक खरातसह पत्नीवर शेतक-याची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यानंतर खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्या असून शिर्डी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. त्यातच, आरोपी कल्पना खरात परदेशात पळून जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. कारण, यापूर्वी अशोक खरात देखील परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होती. मात्र, पोलिसांनी त्याला संधीच दिली नाही, त्याच पार्श्वभूमीवर आता कल्पना खरात यांनाही पळून जाता येऊ नये म्हणून शिर्डी पोलिसांकडून लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली.

 

Web Title: The oshnojal mystery fake godman ashok kharat accused of forced abortion using unknown pills

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • Maharashtra Politics
  • rupali chakankar

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 
1

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 

Maharashtra Breaking News Live Updates Today:  ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच
2

Maharashtra Breaking News Live Updates Today: ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर
3

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर

Mira Bhayandar: ५०० कोटींच्या कर्जप्रस्तावावरून भाजप अडचणीत? नगरविकास विभागाकडून महापालिकेकडे हिशोब
4

Mira Bhayandar: ५०० कोटींच्या कर्जप्रस्तावावरून भाजप अडचणीत? नगरविकास विभागाकडून महापालिकेकडे हिशोब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.