crime (फोटो सौजन्य: social media)
धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्री आणि त्याचे मालक सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. सोशल मीडियावर सतत चर्चेत ते असतात. आता हॉटेल भाग्यश्रीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी स्वत: आपबिती सांगितली आहे.
धक्कादायक ! साडेचार वर्षांच्या चिमुकलीवर तरुणाकडून अत्याचार; नराधमाने बालिकेला घरी नेलं…
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हे बुधवारी सायंकाळी सात ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या हॉटेल समोर उभे होते. त्यावेळी एक चारचाकी तिथे आली. त्या गाडीमधील लोकांनी सेल्फीच्या बहाण्याने नागेश मडके यांना बोलावून घेतले.यावेळी नागेश मडके हे कारजवळ गेले. कारमध्ये बसलेल्या आरोपींनी मडके यांनी कारच्या खिडकीजवळ बोलावलं. ते जवळ येताच आरोपींनी मडके यांना खिडकीत अडकवलं आणि त्यांचं अपहरण केलं. अपहरणकर्त्यांनी त्यांना पाच किलोमीटर पर्यंत फरफटत नेले.
याआधीही धमकीचे आले होते फोन
गाडीत असणाऱ्या पाच अपहरणकर्त्यांनी त्यांना यावेळी बेदम मारहाण केली. यावेळी ह्याला मारुन टाकू, मरेपर्यंत सोडायचे नाही.ह्याला मारुन टाकायचं अन् पुलात फेकून द्यायचं अशी धमकी ते देत होते. यानंतर त्यांनी वडगावच्या पुलावर फेकून दिले, असा खळबळजनक दावा स्वतः भाग्यश्रीचे मालक नागेश मडकेंनी केला आहे. दरम्यान, मला याआधाही धमकीचे फोन आले होते. त्यानंतर असा मारहाणीचा प्रकार घडला असल्याचे मडके यांनी सांगितले आहे. अपहरणकर्त्यांनी जीवे मारण्याचा डाव रचला होता, असा आरोपही नागेश मडके यांनी केला.
रुग्णालयात उपचार सुरु
या मारहाणी नंतर नागेश मडके यांनी त्यांच्या कुटुंबियांना फोन करून सदर घटना सांगितली. या मारहाणीत ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही आहे. लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे नागेश मडके यांनी सांगितले
मित्रासह लॉजवर गेलेल्या तरुणीला भावाने पकडले रंगेहात; तरुणाच्या पोटात खंजर
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन तरुणी आप आपल्या मित्रासह लॉजवर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यात असलेल्या एका तरुणीच्या भावला कुणकुण लागली. तरुणीचा भाऊ थेट लॉजवर पोहोचला आणि तिला रंगेहाथ पकडले आणि मोठा राडा झाला. ही घटना नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एका गावात घडली. राडा करणारा तरुणीचा भाऊ अल्पवयीन असून तो त्याच्या दोन मित्रांसोबत तो तिथे गेला होता. पोलिसांनी या प्रकणी जिवे मारण्याचा प्रयत्न अन् अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Kolhapur : ठेकेदाराने महानगरपालिकेला लावला लाखोंचा चुना; खोट्या सह्या केल्या अन्…