Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात मद्यधुंद तरुणांचा कारमधून जीवघेणा स्टंट, डेक्कन पोलिसांकडून पाठलाग; नेमकं काय घडलं?

उच्चभ्रू आणि वर्दळीच्या लॉ कॉलेज रस्त्यावर मध्यरात्री मद्यधुंद तरुणांनी भरधाव कारच्या मागील खिडक्यांमधून शरीर बाहेर काढत हातात बियरच्या बाटल्या उंचावत आरडाओरडा करत जीवघेणा स्टंट करून धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 13, 2026 | 05:43 PM
पुण्यात मद्यधुंद तरुणांचा कारमधून जीवघेणा स्टंट, डेक्कन पोलिसांकडून पाठलाग; नेमकं काय घडलं?

पुण्यात मद्यधुंद तरुणांचा कारमधून जीवघेणा स्टंट, डेक्कन पोलिसांकडून पाठलाग; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

पुणे : उच्चभ्रू आणि वर्दळीच्या पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावर मध्यरात्री मद्यधुंद तरुणांनी भरधाव कारच्या मागील खिडक्यांमधून शरीर बाहेर काढत हातात बियरच्या बाटल्या उंचावत आरडाओरडा करत जीवघेणा स्टंट करून धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. पाच तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नोटीस दिली. हे तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, मोटार वाहन कायदा आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. ही घटना दिनांक १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डेक्कन पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई तुळशीराम भानुदास शेंडगे आणि पोलीस शिपाई महेर हे लॉ कॉलेज रोड परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी लॉ कॉलेजकडून नळस्टॉपच्या दिशेने एक सिल्व्हर रंगाची एलेंट्रा कार भरधाव वेगाने जाताना दिसली. कारच्या मागील दोन्ही खिडक्यांमधून तरुण अर्धे बाहेर येऊन हातात बियरच्या बाटल्या उंचावत ते मोठमोठ्याने आरडाओरडा करीत असल्याचे दिसू आले. त्यांच्या या हुल्लडबाजीनंतर पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला. पोलिसांची चाहूल लागताच कारचालकाने नळस्टॉपच्या दिशेने कार आणखी वेगाने पळवली. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत कारचा क्रमांक टिपून घेतला. नंतर तांत्रिक तपासाच्या आधारे कारचा आणि त्यातील तरुणांचा शोध घेण्यात आला. अखेर पाचही जणांना पोलिस ठाण्यात हजर केले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पाचही तरुणांनी मद्यप्राशन केल्याचे समोर आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कुलाळ करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : पाच वर्षांत राज्यातील 36211 कंपन्यांना टाळे, मुंबईत सर्वाधिक कंपन्या बंद; वाचा सविस्तर आकडेवारी

पुण्यात तरुणाचा खून

पुण्याचा मध्यभाग असलेल्या गणेश पेठ परिसरात वडापाव खरेदीसाठी गेल्यानंतर पायाला धक्का लागल्यावरून वाद झाल्यानंतर तरूणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश पेठेतील डुल्या मारूती चौक परिसरात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. शिवम राजेश परदेशी (वय २८, रा. गणेश पेठ) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी वैभव किशोर साळुंखे (वय २४, रा. गणेश पेठ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The police detained youths who were performing stunts in a car after consuming alcohol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण
1

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण

‘तुम्ही अश्लील वेबसाइट…’; देवगडमध्ये Digital Arrest चा भयानक थरार, शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूक
2

‘तुम्ही अश्लील वेबसाइट…’; देवगडमध्ये Digital Arrest चा भयानक थरार, शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूक

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय
3

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?
4

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.