सौजन्य - नवराष्ट्र टीम
पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर काळंगे, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, मनीषा वलसे, तेजस चोपडे, गणेश जाधवर, येसनपुरे यांनी ही कामगिरी केली आहे. विसर्जन मिरवणुकीत भाविकांची लक्ष्मी रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना परिसरात गर्दी झाली होती. विसर्जन मिरवणुकीत भाविकांचे मोबाइल संच चोरणारी चोरट्यांची टोळी नदीपात्र परिसरात लूटमार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेतले.
चौकशीत चोरट्यांनी विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत भाविकांकडील मोबाइल संच चोरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांच्याकडून ६३ मोबाइल संच आणि मोटार जप्त केले. चोरटे विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरी करण्यासाठी खास मोटारीने मालेगावातून पुण्यात आले होते. विसर्जन मिरवणुकीत भाविकांचे मोबाइल संच चोरण्यासाठी चोरटे मोटारीने पुण्यात आले होते, अशी माहिती तपासात मिळाली.






