Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड

विसर्जन मिरवणुकीत भाविकांकडील मोबाइल संच चोरणाऱ्या टोळीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांकडून ६३ मोबाइल संच, मोटार असा ३० लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 27, 2026 | 02:46 PM
गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड

Follow Us
Follow Us:
  • गणपतीच्या गर्दीत हातसफाई!
  • पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद
  • ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड
पुणे : विसर्जन मिरवणुकीत भाविकांकडील मोबाइल संच चोरणाऱ्या टोळीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांकडून ६३ मोबाइल संच, मोटार असा ३० लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले ११ आरोपी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव परिसरातील आहेत. अब्दुल कादीर नूर मोहम्मद (वय २८), अब्दुल मलीक अब्दुल खालीक (वय २२), जियाउल रहेमान शौकत हुसेन (वय २६), मोहम्मद अस्वद मोहम्मद अजमल (वय ३१), फैसल अजीज खान (वय २४), हुजेफा अंजूम मोहम्मद साजीद (वय ३०), जुबेर अहमद मुख्तार अहमद (वय ३५), अजहर अहमद अल्ताफ अममद मोमीन (वय ३०), नावेद अख्तर शफीक अहमद अन्सारी (वय ३३), अतहर अहमद एजाज अहमद (वय २३, सर्व रा. मालेगाव, जि. नाशिक), अतुल मारोती इंगळे (वय २४, रा. गिरोली, जि. वाशीम) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर काळंगे, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, मनीषा वलसे, तेजस चोपडे, गणेश जाधवर, येसनपुरे यांनी ही कामगिरी केली आहे. विसर्जन मिरवणुकीत भाविकांची लक्ष्मी रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना परिसरात गर्दी झाली होती. विसर्जन मिरवणुकीत भाविकांचे मोबाइल संच चोरणारी चोरट्यांची टोळी नदीपात्र परिसरात लूटमार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेतले.

चौकशीत चोरट्यांनी विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत भाविकांकडील मोबाइल संच चोरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांच्याकडून ६३ मोबाइल संच आणि मोटार जप्त केले. चोरटे विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरी करण्यासाठी खास मोटारीने मालेगावातून पुण्यात आले होते. विसर्जन मिरवणुकीत भाविकांचे मोबाइल संच चोरण्यासाठी चोरटे मोटारीने पुण्यात आले होते, अशी माहिती तपासात मिळाली.

हे सुद्धा वाचा : पिके करपली, शेतकरी संकटात; इंदापुर तालुक्यात कृषिमंत्री भरणेंनी घेतला नुकसानीचा आढावा

Web Title: The police have arrested a gang of mobile phone thieves in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई; मुलुंडमधील कथित जमीन गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल
1

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई; मुलुंडमधील कथित जमीन गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल

वाघोलीत थरार! बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी कारने उडवले अन् नंतर…
2

वाघोलीत थरार! बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी कारने उडवले अन् नंतर…

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?
3

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?

Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव
4

Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.